Join us  

GT vs SRH Live : पहिला डाव गुजरात टायटन्सचा! सनरायझर्स हैदराबादच्या धावगतीला लावला चाप

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Marathi - सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा झंझावात रोखण्यात गुजरात टायटन्सला यश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 5:10 PM

Open in App

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Marathi - सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा झंझावात रोखण्यात गुजरात टायटन्सला यश आले. ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम व हेनरिच क्लासन या आक्रमक फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. नूर अहमद व राशिद खान यांनी फिरकीची कमाल दाखवली. मोहित शर्मानेही टिच्चून मारा करताना हैदराबादची धावसंख्या रोखली. 

राशिद खानने आज मोहम्मद शमीचा मोठा विक्रम मोडला; सोबत कसला भारी कॅच घेतला, Video

ट्रॅव्हिस हेड व मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु आजमतुल्लाह ओमारजाई याने गुजरातला यश मिळवून दिले. मयांक अग्रवाल ( १६) झेलबाद झाल्याने हैदराबादला ३४ धावांवर पहिला धक्का बसला. नूर अहमदने त्याच्या पहिल्याच चेंडूवर हेडचा झेल टाकला, परंतु तिसऱ्या चेंडूवर गुगलीवर त्याने त्रिफळा उडवला. ट्रॅव्हिस हेड १९ धावांवर बाद झाला.  त्यानंतर मोहित शर्माने त्याच्या पहिल्या षटकात अभिषेक शर्मा ( २९) ला बाद करून SRH ला तिसरा धक्का दिला.   हेनरिच क्लासेन व एडन मार्करम ही फॉर्मात असलेली जोडी मैदानावर उभी राहिली आणि क्लासेनने गुजरातच्या नूरला दोन खणखणीत षटकार खेचले. पण, राशिद खानने गुगलीवर क्लासेनचा ( २४) त्रिफळा उडवला. टायटन्सकडून तो सर्वाधिक ४९ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आणि त्याने मोहम्मद शमीला ( ४८) मागे टाकले. पुढच्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर राशिदने अप्रतिम झेल टिपला आणि मार्करम १७ धावांवर बाद झाला. सनरायझर्स हैदराबादचा निम्मा संघ ११४ धावांवर तंबूत परतला.    अब्दुल समदने सलग दोन चौकार खेचून हैदराबादवरील दडपण कमी केले.  शाहबाज अहमद व अब्दुल समद यांनी चांगला खेळ करताना हैदराबादला दीडशेपार नेले. पण, मोहित शर्माने ही जोडी तोडताना अहमदला ( २२) माघारी पाठवले. मयांकच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या वॉशिंग्टन सुंदर गोल्डन डकवर बाद झाला. पण, मोहितची हॅटट्रिक पॅट कमिन्सने पूर्ण होऊ दिली नाही. समद २९ धावांवर नाबाद राहिला, पण हैदराबादला ८ बाद १६२ धावाच करता आल्या. मोहितने २०व्या षटकात ३ धावा देताना ३ विकेट्स मिळवून दिल्या.

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादगुजरात टायटन्स