IPL 2020 Update: बीसीसीआयला अजूनही सरकारच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा; IPLच्या ट्विटनं आणला ट्विस्ट

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठीची आज महत्त्वाची बैठक पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 10:42 PM2020-08-02T22:42:31+5:302020-08-02T22:42:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL to be staged in UAE subject to clearance from Government of India, says BCCI | IPL 2020 Update: बीसीसीआयला अजूनही सरकारच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा; IPLच्या ट्विटनं आणला ट्विस्ट

IPL 2020 Update: बीसीसीआयला अजूनही सरकारच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा; IPLच्या ट्विटनं आणला ट्विस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात आयपीएलची तारीख ठरवरण्यात आली असून डबल हेडर आणि सामन्यांची वेळही ठरवण्यात आली. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) आधीच जाहीर केले होते. ही स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरू होणार होती, परंतु अंतिम सामन्याच्या तारखेवरून थोडा गोंधळ होता तोही आज सुटला. सुरुवातीला या लीगला केंद्र सरकारनं परवानगी दिली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. पण, आयपीएलच्या ट्विटनं अजूनही मान्यता मिळालेली नाही, हे स्पष्ट होत आहे. 

गव्हर्निंग काऊंसिलच्या आज झालेल्या बैठकीत 19 सप्टेंबरला ही स्पर्धा सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. 53 दिवसांच्या कालावधीत 10 डबल हेडर सामने रंगणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघ 24 खेळाडूंनाच घेऊन जाणार आहे. 


 IANS शी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''10 नोव्हेंबरपर्यंतच स्पर्धा खेळवण्याचे आम्ही ठरवले आहे आणि त्यामुळे 10 नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मंगळवारी आयपीएल फायनल खेळवली जाईल. दोन सामन्यांमध्ये पुरेसा गॅप असावा याची काळजी आम्ही घेतली आहे. प्रवासाचा वेळ, जैव सुरक्षितता वातावरण आणि अऩ्य काही गोष्टी डोक्यात ठेवून 10 डबल हेडर सामने खेळवण्याचे ठरले आहे.''

''आयपीएलचा सामना 30 मिनिटे आधी खेळवण्याचे ठरले आहे आणि त्यामुळे सामने 7.30 वाजता खेळवण्यात येतील. सामना पाहण्यासाठी प्रेक्षक असते तर खेळाडूंचा उत्साह वाढला असता, परंतु खेळाडूंची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे या गोष्टींवर वेळ आल्यावर अमिराती क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली जाईल,''असेही अधिकाऱ्यानं सांगितले.  
येत्या आठवडाभरात केंद्र सरकारकडूनही मिळण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाचे मुद्दे
- 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार लीग
- 10 डबल हेडर सामने ( 3.30 वाजता होतील सामने)
- दुबई, शाहजाह आणि अबुधाबी येथे होतील सामने
- महिला ट्वेंटी-20 चॅलेंज होणार, तीन संघांमध्ये चार सामने खेळवण्यात येणार
- अजूनही सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा

Web Title: IPL to be staged in UAE subject to clearance from Government of India, says BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.