१५० कि.मी. प्रतिताशी वेगाचा ‘बेताज बादशाह’ - इरफान पठाण

उमरानचे प्रशिक्षक राहिलेला भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने लोकमत समूहाचे स्पोर्ट्स हेड आणि उपाध्यक्ष मतीन खान यांच्याशी खास बातचीत केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:02 AM2022-04-19T10:02:48+5:302022-04-19T10:05:07+5:30

whatsapp join usJoin us
Irfan Pathan says Umran Malik the king of 150 km speed balling | १५० कि.मी. प्रतिताशी वेगाचा ‘बेताज बादशाह’ - इरफान पठाण

१५० कि.मी. प्रतिताशी वेगाचा ‘बेताज बादशाह’ - इरफान पठाण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : रविवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यात अंतिम षटक निर्धाव टाकून उमरान मलिकने चार बळी घेतले. सध्या आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याने अनेकांना भुरळ घातली आहे.  उमरानचे प्रशिक्षक राहिलेला भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने लोकमत समूहाचे स्पोर्ट्स हेड आणि उपाध्यक्ष मतीन खान यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्याने उमरान मलिकच्या सध्याच्या कामगिरीवर आणि भविष्यातील त्याच्यासमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला.

उमरानला पाहिल्यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
इरफान : नेटमध्ये त्याच्या गोलंदाजीचा वेग बघून मी आश्चर्यचकीत झालो होतो. कारण मी कोणत्याच भारतीय गोलंदाजाला सलग इतक्या वेगाने गोलंदाजी करताना बघितले नव्हते. मला आठवतं आहे की, मी जम्मू काश्मीरचा प्रशिक्षक असताना अब्दुल समद उमरान ओळख करून देताना म्हणाला, ‘भाई हा एक चांगला गोलंदाज आहे. जरा लक्ष ठेवा याच्यावर.’ त्यावेळी मी अनुभवले की उमरानमध्ये काहीतरी खास आहे.

उमरानमध्ये असलेल्या कोणत्या उणिवा सुधारण्यावर तू काम केलेस?
 इरफान : फार नाही पण त्याच्यातल्या दोन उणिवांवर काम केले. त्याची गोलंदाजीची लय उत्तम होती. फोलोथ्रुपण चांगला होता. मात्र, वेग वाढविण्याच्या नादात तो फुलटॉस चेंडू टाकायचा. त्याच्या या गोष्टीवर काम करण्याचे मी ठरविले. मात्र, हे करीत असताना मी एका गोष्टीची काळजी घेतली की नैसर्गिक प्रतिभेसोबत जास्त छेडछाड करायची नाही.

काय वाटतं, उमरानचं करिअर योग्य दिशने जातंय?
इरफान : नक्कीच. मी दोन वर्षांपासून जम्मू-काश्मीरच्या संघासोबत नाही. पण माझं अधेमधे तिथल्या खेळाडूंसोबत उमरान संदर्भात बोलणं सुरू असतं. सनरायजर्स हैदराबादच्या संघात सध्या त्याची उत्तम जडणघडण होते आहे. तसेच केन विल्यमसनसारखा कर्णधार असल्याने उमरानला घडविण्यात त्याचा हातभारच लागेल.

उमरानला तू काय सांगू इच्छितो किंवा तुझा काय सल्ला असेल त्याच्यासाठी ?
इरफान : उमरानला स्वत:ला सतत प्रोत्साहित करत राहावे लागणार आहे. कारण वेगवान गोलंदाजाला तंदुरुस्ती राखण्यासाठी याची गरज असते.  जसं मी आधी सांगितलं की, उमरानमध्ये नैसर्गिक प्रतिभा आहे, ज्याचा त्याला योग्यरीतीने सांभाळ करावा लागेल.

उमरानच्या भविष्याकडे तू कशा पद्धतीने बघतो?
इरफान : मला पक्की खात्री आहे उमरान लवकरच भारतीय संघाकडून खेळताना दिसेल. त्यानंतर उमरानला योग्यरीत्या हाताळण्याची, त्याची काळजी घेण्याची जबाबदारी बीसीसीआयवर असेल. कारण ही पहिलीच वेळ आहे की ताशी १५० किलोमीटरच्या वेगाने सलग गोलंदाजी करू शकणारा गोलंदाज भारताला मिळालेला आहे. तसेही सध्या त्याच्या वेगाने अनेक दिग्गज फलंदाजांना धडकी भरली आहे. अजून एक गोष्ट, उमरानची कामगिरी जर अशीच चांगली होत राहिली तर त्याला प्रोत्साहन देत राहावे लागेल. कोणत्याही कारणाने जर त्याचा बॅड पॅच सुरू झालाच तर त्याला यातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही बीसीसीआयची असेल. कारण असे गोलंदाज रोज-रोज तयार होत नसतात.
 

Web Title: Irfan Pathan says Umran Malik the king of 150 km speed balling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.