इंग्लंडच्या संघात एक-दोन वर्षांपूर्वी पदार्पण करणाऱ्या जोफ्रा आर्चरनं आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केले. गतवर्षी पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीनं भल्या भल्या दिग्गजांना हतबल केले. त्यानं 11 सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या. अॅशेस मालिकेतही त्यानं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. सध्या हा खेळाडू दुखापतीमुळे विश्रांतीवर आहे आणि त्याचे इंडियन प्रीमिअऱ लीगमध्येही ( आयपीएल 2020) खेळणेही अवघड आहे. मैदानावरील कामगिरीप्रमाणेच जोफ्रा आर्चरची सोशल मीडियावरील कामगिरीही नेहमी चर्चेत राहिली आहे. त्यानं केलेले ट्विट ही भविष्यवाणीच असते, अशी भावना चाहत्यांमध्ये झालेली आहे. अनेकदा तसे योगायोग जुळूनही आले आहेत. असाच योगायोग पुन्हा जुळला आहे आणि लोकांनी त्याच्या त्या ट्विटला सध्याच्या कोरोना व्हायरसशी जोडले आहे.
काहींनी तर जोफ्राला देवाची उपाधी दिली आहे. त्यानं सहा वर्षांपूर्वी केलेलं एक ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे आणि त्याच्या या ट्विटला लोकांनी सध्या जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसशी जोडले आहे. कोरोना व्हायरसचे सध्या जगभरात 3 लाख 38,724 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 99, 003 रुग्ण बरे झाले आहेत, तर 14,687 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात कर्फ्यूचं वातावरण आहे, लोकांना आपापल्या घरीच बंदीस्त रहावे लागत आहे. कुठे जावं, कुठे जाऊ नये हे काहीच कळत नाही.
जोफ्रानं सहा वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमध्येही अशाच परिस्थितीची भविष्यवाणी केली होती आणि लोकांनी त्याचा संबंध सध्याच्या परिस्थितीशी जोडून जोफ्राला देवाची उपाधी दिली आहे. 2014मध्ये जोफ्रानं ट्विट केलं होतं की,''पळायलाही जागा राहणार नाही, असा दिवस येईल.''
IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड
Coronavirus : लढा कोरोनाविरुद्धचा : ‘युवराज-कैफ यांच्यासारख्या निर्णायक भागीदारीची गरज’