जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जाँटी ऱ्होड्स हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे आणि याबाबत कुणाचेही दुमत नसेल. चपळ क्षेत्ररक्षण आणि अचूक झेल टिपण्यात त्याचा हात कोणी धरूच शकत नाही. 1992 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या रन आऊटनंतर त्याच्या नावाचीच चर्चा राहिली. त्यानंतर त्याने अनेक अविश्वसनीय झेल टिपले आणि अनेक रन आऊटही केले. सर्वश्रेष्ठ फिल्डर असलेल्या जाँटीने जगातील पाच सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांची निवड केली आहे आणि त्यात भारताच्या खेळाडूचाही समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी ( आयसीसी) बोलताना जाँटीने हे पाच सर्वोत्तम क्षेत्ररक्षक निवडले आहेत. त्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या अँड्य्रु सायमंड्सचा समावेश केला आहे. मैदानावरील वर्तुळाबाहेर आणि आत कोणत्याही पोझिशनवर सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून जाँटीने ऑसी खेळाडूची स्तुती केली आहे. त्यानंतर त्याने सहकारी हर्षेल गिब्सची निवड केली. गिब्ससोबत क्षेत्ररक्षण करण्याचा आनंदच निराळा असल्याचे जाँटी सांगतो. गिब्सने आफ्रिकेकडून 210 झेल टिपले आहेत. प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या धावांवर लगाम लावण्याचे श्रेय जाँटी व गिब्स या जोडीला जाते. त्यांची क्षेत्ररक्षणाची भींत भेदणे भल्याभल्या फलंदाजांना जमायचे नाही.
या यादित इंग्लंडचा पॉल कॉलिंगवूड याचा तिसरा क्रमांक येतो. जाँटीप्रमाणे कॉलिंगवूड हा इंग्लंड संघातील क्षेत्ररक्षणाचा बादशाह होता. जाँटीने आणखी एका सहकारी एबी डिव्हिलियर्स याची उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड केली. यष्टिमागे डिव्हिलियर्स अपयशी ठरला असला तरी त्याने क्षेत्ररक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.
अखेरीस जाँटीने भारताच्या सुरेश रैनाची पाचव्या स्थानी निवड केली. भारतातील कमी गवत असलेल्या खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण करणे नेहमी आव्हानात्मक होते, परंतु रैना अगदी सहजतेने ते करून जायचा. स्लीपमध्येही त्याच्या क्षेत्ररक्षणाला तोड नाही, असे जाँटी म्हणाला.
वायरल सत्य: सुरेश रैनाचे अपघाती निधन ? नेमकं घडलंय तरी काय... भारताचा फलंदाज सुरेश रैनाचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. एका व्हिडीओमध्ये रैनाचे अपघाती निधन झाल्याचे दिसत आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच वायरलही झाला आहे. या वृत्तामुळे बऱ्याच जणांना धक्का बसला आणि त्यांनी यामागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. यूट्यूबवर काही जणांनी व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या निधनाची वार्ता कळल्यावर रैना चांगलाच भडकला असून त्याने यूट्यूब चॅनेलच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. रैनाने ट्विटरच्या माध्यमातून ही अफवा दूर केली आहे.
रैनाने ट्विटरवर लिहीले आहे की, " माझ्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्ये माझे निधन झाल्याची अफवा पसरली आहे. या अफवांमुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार मी दाखल करणार आहे. या अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई व्हायला हवी. माझी सर्वांना विनंती आहे की, या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी एकदम फिट आहे."
Web Title: Jonty Rhodes reveals Suresh Raina and four others as all-time best fielders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.