Join us  

कार्तिकदेखील धोनीसारखाच संयमी - ड्युप्लेसिस

कार्तिकच्या अनुभवाचा आम्हाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 5:48 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : ‘अखेरच्या काही षटकांमध्ये दबावाच्या क्षणी शांतपणे फलंदाजी करणे आव्हानात्मक असते. हे आव्हान दिनेश कार्तिकने चांगल्या प्रकारे पार केले. तो महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच शांत असून अंतिम षटकातील त्याचा खेळ धोनीप्रमाणेच आहे,’ असे सांगत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (आरसीबी) कर्णधार फाफ ड्युप्लेसिस याने दिनेश कार्तिकचे कौतुक केले. 

बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या १२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव घसरला होता. परंतु, कार्तिकने अंतिम क्षणी मोक्याच्या वेळी फटकेबाजी करत संघाला विजयी केले. सामन्यानंतर ड्युप्लेसिस म्हणाला की, ‘कार्तिकच्या अनुभवाचा आम्हाला फायदा झाला. तो खूप शांत होता. धोनी ज्याप्रमाणे अखेरच्या पाच षटकांमध्ये शांत असतो, कार्तिकही बहुतेक त्याचप्रमाणे शांत राहिला होता.’ ड्युप्लेसिस पुढे म्हणाला की, ‘हा चांगला विजय ठरला. लहान धावसंख्येचा पाठलाग करताना सकारात्मक विचाराने खेळणे महत्त्वाचे ठरते. सामना इतका लांबला नव्हता पाहिजे. पण, कोलकाताने चांगली गोलंदाजी केली. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक होती’. 

n दिनेश कार्तिकने शेवटच्या क्षणी बहारदार खेळ केल्यामुळे आरसीबी विजय संपादन करू शकला. आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर कार्तिकला फिनिशर संबोधले.  शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने चांगला खेळ केल्यामुळे संघ विजय झाला. शेवटच्या षटकामध्ये सहा चेंडूमध्ये सात धावांची गरज होती.  दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला. त्याने पहिल्याच चेंडूमध्ये जोरदार फटका मारत षटकार लगावला आणि दुसऱ्याच चेंडूमध्ये सामना आरसीबीच्या नावावर केला.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनी
Open in App