Kavya Maran Vs Ambani, part 2 : IPL 2022 Mega Auction : अंबानी को हराके मजा आया...; युवा गोलंदासाठी MI vs SRH भिडले, बोली जिंकताच काव्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सलग दुसऱ्या दिवशी लिलाव सुरू आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लाएम लिव्हिंगस्टोन याला दुसऱ्या दिवशी आतापर्यंत ११.५० कोटींची सर्वाधिक बोली मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 01:38 PM2022-02-13T13:38:26+5:302022-02-13T13:39:09+5:30

whatsapp join usJoin us
Kavya Maran Vs Ambani, part 2: IPL 2022 Mega Auction: Marco Jansen, the left-arm pace from South Africa, sold to Sunrisers Hyderabad for INR 4.20 crore, Mumbai Indians out of the race | Kavya Maran Vs Ambani, part 2 : IPL 2022 Mega Auction : अंबानी को हराके मजा आया...; युवा गोलंदासाठी MI vs SRH भिडले, बोली जिंकताच काव्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

Kavya Maran Vs Ambani, part 2 : IPL 2022 Mega Auction : अंबानी को हराके मजा आया...; युवा गोलंदासाठी MI vs SRH भिडले, बोली जिंकताच काव्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सलग दुसऱ्या दिवशी लिलाव सुरू आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लाएम लिव्हिंगस्टोन याला दुसऱ्या दिवशी आतापर्यंत ११.५० कोटींची सर्वाधिक बोली मिळाली आहे. त्याला पंजाब किंग्सने ( Punjab Kings) आपल्या ताफ्यात घेतले. लिव्हिंगस्टोनसाठी सनरायझर्स हैदराबादनेही ( Sunrisers Hyderabad) जोरदार प्रयत्न केले, परंतु ११ कोटीपर्यंत येताच त्यांनी माघार घेतली. त्यामुळे SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) काहीशी निराश झाली होती. पण, तिने ही निराशा मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) मालक आकाश अंबानी याला हरवून दूर केली. 

काल इशान किशनसाठी Kavya Maran vs Ambani असा सामना रंगला होता
दोन कोटी मुळ किंमत असलेल्या इशानची बोली सुरू होताच मुंबई इंडियन्सने ऑक्शन पॅडल उभा केला. त्यानंतर पंजाब किंग्सनं बोली लावण्यास  सुरूवात केली. पंजाब किंग्सने ७.७५ कोटीपर्यंत इशानचा भाव वाढवला. त्यानंतर गुजरात टायटन्स शर्यतीत उतरले आणि त्यांनी १२ कोटीपर्यंत इशानसाठी बोली लावली. आता इशान आपलाच असे मुंबई इंडियन्सला वाटत असताना SRHची मालकिण काव्या मारन शर्यतीत सहभागी झाली आणि तिने मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचं टेंशन वाढवले. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत जी स्ट्रॅटेजी वापरून अन्य खेळाडूंची किंमत वाढवली. त्याचाच वापर करून काव्या मारनने इशानची किंमत १५ कोटींवर नेऊन ठेवली आणि मुंबईला काही करून १५.२५ कोटी मोजून इशानला ताफ्यात घ्यावे लागले. 

आज Kavya Maran vs Ambani Part 2 पाहायला मिळाला..
दक्षिण आफ्रिकेचा ६.८ फुटांचा उंच गोलंदाज मार्को येनसेन याच्यासाठी SRH व MI असा सामना रंगला. २० लाख मुळ किंमत असलेल्या मार्कोसाठी मुंबई इंडियन्सने सुरुवातीला उत्सुकता दाखवली. मागच्या पर्वात मार्कोला त्यांनी २० लाखातच संघात घेतले होते आणि याहीवेळेस त्यांचा तोच प्रयत्न होता. पण, काव्या मारनने ऑक्शन पॅडल उचलला आणि सामना सुरू झाला. ४ कोटींपर्यंत मुंबई इंडियन्सने ताकद लावली, परंतु अखेर त्यांनाही बजेट सांभाळण्यासाठी माघार घ्यावी लागली. SRH ने ४.२० कोटींत मार्कोला ताफ्यात दाखल करून घेतले.  Marco Jansen, the tall left-arm pace from South Africa, sold to Sunrisers Hyderabad for INR 4.20 crore. २१ वर्षीय मार्कोने १३ ट्वेंटी-२० सामन्यांत ७१ विकेट्स घेतल्या आहेत. 

Web Title: Kavya Maran Vs Ambani, part 2: IPL 2022 Mega Auction: Marco Jansen, the left-arm pace from South Africa, sold to Sunrisers Hyderabad for INR 4.20 crore, Mumbai Indians out of the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.