जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीनं भारत-इंग्लंड ( India vs England) कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवला, परंतु टीम इंडियानं कमबॅक करताना दुसरी कसोटी ३१७ धावांनी जिंकली आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे आता इंग्लंडचा अंतिम सामन्यात खेळण्याचा मार्ग अवघड झाला आहे. त्यांना उर्वरित दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील. त्यात आजच्या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनीही जो रूटच्या संघाला ट्रोल केले.
इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन ( Kevin Pietersen) यानंही हिंदीत ट्विट करताना 'England B' ला हरवल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केलं. त्याच्या या ट्विटवर नेटिझन्स सुसाट सुटले आणि केपीला ट्रोल करू लागले. पराभवानंतर इंग्लंडचा संघ सैरभैर; विराटची विकेट अन् १० चेंडूंत ५ षटकार खेचणारा खेळाडू संघाबाहेर
Twitterati then came up with funny replies to this tweet.
वासिम जाफरनं केलं ट्रोल न करण्याचं आवाहन
Web Title: Kevin Pietersen continues funny Hindi banter; Twitterati reacts to 'England B' tweet
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.