वेस्ट इंडीज ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू किरॉन पोलार्डने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात नावावर केला. वेस्ट इंडिजनं या सामन्यात श्रीलंकेवर २५ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजच्या ४ बाद १९६ धावांचा पाठलाग करतान श्रीलंकेचा संपूर्ण संघ १७१ धावांवर तंबूत परतला. या सामन्यात पोलार्डनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला पार केला. पण, मैदानावर पाऊल टाकताच त्यानं नावावर केलेला विक्रम आतापर्यंत कोणालाही जमलेला नाही.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या विंडीजनं ४ बाद १९६ धावा केल्या. सलामीवीर लेंडल सिमन्स आणि ब्रँडन किंग यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करून दिली. किंग २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ३३ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरणला ( १४) मोठी खेळी करता आली नाही. आंद्रे रसेल आणि पोलार्ड यांनी तुफानी फटकेबाजी केली. रसेलनं १४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ३५, तर पोलार्डने १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३४ धावा केल्या. लेंडल सिमन्स ५१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार खेचून ६७ धावांवर नाबाद राहिला. पोलार्डने या खेळीसह ट्वेंटी-२०त दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला.
सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने खेळणारे खेळाडूकिरॉन पोलार्ड - ५००ड्वेन ब्राव्हो - ४५३ख्रिस गेल - ४०४शोएब मलिक - ३८२ब्रेन्डन मॅकलम - ३७०
ट्वेंटी-२०त १० हजार धावा करणारा दुसरा फलंदाजख्रिस गेल - १३२९६ धावाकिरॉन पोलार्ड - १०००० धावा