इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाला सुरूवात होण्यापूर्वी आजपासून कॅरेबियन प्रीमिअर लीग ( सीपीएल) सुरू झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीला उशीर झाला. सामन्यांच्या षटकांची संख्याही कमी करून 17-17 इतकी करण्यात आली आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याचा मालकी हक्क असलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स यांच्यात सलामीचा सामना सुरू झाला आहे. नाइट रायडर्सचा कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इतक्या महिन्यानंतर सुरू झालेल्या या लीगचा सामना पाहण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनशे कार्तिक फार उत्सुक आहे. त्यानं तसं ट्विट करून त्याची उत्सुकता व्यक्त केली.
वानखेडे स्टेडियनवर महेंद्रसिंग धोनीच्या नावाची कायमस्वरूपी सीट; एमसीएकडे प्रस्ताव
रायडर्स संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे असणार आहे. ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली नाइट रायडर्सनं 2017 आणि 2018चे सीपीएल जेतेपद पटकावले होते. पण, ब्राव्होनं यंदा कर्णधारपद नको, असे मालकांना सांगितल्यानं ती जबाबदारी पोलार्डकडे सोपवण्यात आली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ब्रोव्हो चेन्नई सुपर किंग्सकडून, तर पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतो.
KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक म्हणाला,''मी आता किती आनंदी आहे, हे सांगू शकत नाही. अनेक महिन्यांनंतर मी ट्वेंटी-20 सामना पाहणार आहे. टीमला शुभेच्छा. मी कोणत्या संघाला सपोर्ट करणार, यात काहीच शंका नाही. त्रिनबागो नाइट रायडर्सला माझा पाठींबा. चला चौथं जेतेपद नावावर करा.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020: Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक; BCCI कडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक?
टाटा सन्स, बायजूला मागे सारून 'ड्रीम 11' झाले IPL 2020 चे स्पॉन्सर, मोजले 222 कोटी
Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार
हार्दिक पांड्याने जाहीर केलं मुलाचं नाव; बघा या फोटोत तुम्हाला सापडतंय का?
किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघ मैदानावर उतरणार; थोड्यावेळात ट्वेंटी-20चा थरार सुरू होणार
IPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पोल पोझिशनवर असलेले 'टाटा सन्स'चं नेमकं काय चुकलं?