मोहाली - मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर आयपीएलमध्ये रविवारी होणाऱ्या पहिल्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. या लढतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिलीच्या संघात परतलेला गौतम गंभीर आणि आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करत असलेला रविचंद्र अश्विन यांच्यात जुगलबंदी रंगणार आहे. याआधी कोलकाता नाईटरायडर्सला दोन वेळा विजेतेपद मिळवून देणारा गौतम गंभीय यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व करत आहे. त्याची कामगिरी दिल्लीसाठई महत्त्वाची ठरेल. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि युवा फलंदाज ऋषम पंत यांच्यावरही सर्वांची नजर असेल. दिल्लीच्या संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे. त्यांच्या संघात एकीकडे गौतम गंभी आणि मोहम्मद शमीच्या रूपात अनुभव आहे, तर दुसरीकडे 19 वर्षांखाली विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ, मनजित कालरा आणि ऋषभ पंत हे युवा चेहरे आहेत. दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाबला ख्रिस गेल आणि युवराज सिंह या डावखुऱ्या अनुभवी फलंदाजांकडून धडाकेबाज खेळीची अपेक्षा असेल. त्यांचा अनुभव संघाच्या उपयोगी योऊ शकतो. पंजाबच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. प्रतिस्पर्धी संघ किंग्स इलेव्हन पंजाब - आर. अश्विन (कर्णधार), आरोन फिंच, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, मजीब उर रेहमान.दिल्ली डेअरडेव्हिल्स - गौतम गंभीर (कर्णधार), श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरीस, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, जेसन रॉय, कॉलिन मुन्रो, मोहम्मद शामी, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, पृथ्वी शॉ, राहुल टेवाटिया, विजय शंकर, हर्षल पटेल, अव्हेश खान, शाहबाझ नदीम, डॅनियल ख्रिस्टीयन, जयंत यादव, गुरकिरत सिंग मान, ट्रेंट बोल्ट, मनज्योत कालरा अभिषेक शर्मा, संदीप एल. नमन ओझा, सयन घोष.