मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ 15 एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख ही 23 एप्रिल आहे आणि या स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिलाच देश ठरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( बीसीसीआय) संघ निवडही अंतिम टप्प्यात आहे.
MI च्यासरावसत्रातरोहितशर्मालादुखापत, वर्ल्डकपस्पर्धेपूर्वीभारतीयसंघतणावातhttps://t.co/nY4k9OLCBs@ImRo45@mipaltan#IPL2019@IPL@cricketworldcup@BCCI
— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) April 10, 2019
वर्ल्ड कपसाठीच्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी या वरिष्ठ खेळाडूंची नावं निश्चितच आहेत. पण, संघातील काही जागांसाठी अजूनही बरीच चुरस आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या कामगिरीवर वर्ल्ड कप संघात स्थान मिळणार नसल्याचे कर्णधार कोहली आणि निवड समितीने आधीच स्पष्ट केले आहे. तरीही आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करून संघातील स्थानासाठी दावेदारी मजबूत करण्याचा काही खेळाडूंचा प्रयत्न आहे.
अंबाती रायुडू ( चेन्नई सुपर किंग्स ) : भारतीय संघातील चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडू ही निवड समितीची पहिली पसंती आहे. आयपीएलच्या 12व्या मोसमात त्याला अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने 6 सामन्यांत 15.2 च्या सरासरीने 76 धावा केल्या आहेत.
विजय शंकर (सनराइझर्स हैदराबाद) : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारताच्या वन डे संघात पदार्पण करणाऱ्या विजय शंकरने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर चौथ्या क्रमांकासाठी दावेदारी सादर केली आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. पण, एक सक्षम अष्टपैलू म्हणून तो संघात स्थान पटकावू शकतो.
रिषभ पंत ( दिल्ली कॅपिटल्स ) : महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतचे नाव आघाडीवर आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. त्याने 27 चेंडूंत 78 धावा चोपल्या होत्या, परंतु त्यानंतर त्याची बॅट रुसली आहे.
लोकेश राहुल ( किंग्स इलेव्हन पंजाब ) : कॉफी विथ करण प्रकरणानंतर भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या लोकेश राहुलकडे राखीव सलामीवीर म्हणून पाहिले जात आहे. पण, आयपीएलमध्ये त्याला अजूनही सूर गवसलेला नाही. त्याने हैदराबादविरुद्ध 71 धावांची खेळी केली, परंतु त्याला याआधी अपयश आले. त्याला 6 सामन्यांत 54.25च्या सरासरीने 217 धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे (राजस्थान रॉयल्स) : 2015च्या वन डे वर्ल्ड कप संघाचा सदस्य असलेला अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत आहे. भारतीय वन डे संघाचा तो नियमित सदस्य नसला तरी अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये त्याला 6 सामन्यांत एकच अर्धशतक झळकावता आले आहे.
Web Title: The last chance to get a place in the World Cup team, five player in competition for indian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.