लंडन - महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाने इंग्लंडमधील महिला सुपर लीग टी-20मध्ये सर्वात जलद अर्धशतक, सर्वाधिक षटकार, शतक असे विक्रमांचे इमले रचले आहेत. वेस्टर्न स्टॉर्म क्लबकडून प्रतिनिधित्व करताना स्मृतीने एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला. या लीगमध्ये खेळणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
स्मृतीने सहा सामन्यांत दोन अर्धशतकं आणि एक शतक झळकावले आहे. रविवारी झालेल्या लढतीत वेस्टर्न स्टॉर्मने स्मृती आणि हीदर नाइट यांच्या अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर यॉर्कशायर डायमंडवर सात विकेट राखून विजय मिळवला. 173 धावांचे लक्ष्य स्टॉर्म संघाने सहज पार केले. 22 वर्षीय स्मृतीने या लढतीत 36 चेंडूंत 56 धावा चोपल्या. या कामगिरीसह तिने तब्बल सहा स्पर्धा विक्रमांची नोंद केली.
रविवारच्या सामन्यापूर्वी स्मृतीने पाच सामन्यांत अनुक्रमे 48, 37, नाबाद 52, नाबाद 43 आणि 102 धावा केल्या होत्या. लाँगबोरोध लाईटनिंग क्लबविरूद्ध मंधानाने अवघ्या 18 चेंडूंत 50 धावा कुटल्या. या लीगमधील जलद अर्धशतकाचा विक्रम मंधानाच्या नावावर नोंदवला गेला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला टी-20 लीगमध्ये न्यूझीलंडच्या सोफी डेव्हीन हीच्या नावावर असलेल्या विक्रमाशीही तिने बरोबरी केली होती.लाईटनिंगच्या गोलंदाजांची धुलाई करताना 5 चौकार आणि 4 षटकार खेचून 19 चेंडूंत नाबाद 52 धावा केल्या होत्या
Web Title: Maharashtra's smriti mandhana reach milestone
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.