वेलिंंग्टन : अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रॅँडहोमच्या जलद शतकाच्या जोरावर न्यूझीलंंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपली बाजू भक्कम केली. कॉलिनने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा चौफेर समाचार घेत फक्त ७१ चेंडूत शतक झळकावले.कॉलिनचे हे सातवे कसोटी शतक आहे. कसोटीतील जलद शतकवीरांच्या यादीत तो आता नवव्या स्थानी पोहोचला आहे. न्यझीलंडने दूसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा ९ बाद ४४७ धावा केल्या होत्या. विंडीजचा पहिला डाव १३४ धावांतच आटोपल्यामुळे न्यूझीलंडकडे आता ३१३ धावांची आघाडी आहे. कॉलिन १०५ धावा काढून बाद झाला.त्याने आपल्या खेळीत ११ चौकार व तीन षटकारांची आतषबाजी केली. तत्पूर्वी रॉस टेलर व हेन्री निकोल्स यांनी चौथ्या विकेटसाठी १२७ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. टेलरने ९३ तर निकोल्सने ६६ धावा केल्या. कॉलिन व टॉम ब्लंडेल यांनी सातव्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली. दिवसभराचा खेळ संपला तेव्हा ब्लंडेल ५७ धावांवर खेळत होता.संक्षिप्त धावफलकवेस्ट इंडिज पहिला डाव सर्वबाद १३४न्यूझीलंड पहिला डाव ९ बाद ४४७टॉम लॅथम झे. रोच गो. होल्डर ३७, जीत रावल झे. डावरीच गो. रोच ४२, केन विल्यम्सन झे. होप गो. रोच १, रॉस टेलर पायचीत रोच ३, हेन्री निकोल्स झे. गॅब्रिएल गो. कमिन्स ६७, कॉलिन डी ग्रॅण्डहोम झे. पावेल गो. चेस १०५, टॉम ब्लंडेल नाबाद ५७, नील वेगनर गो. चेस ३, मॅट हेन्री झे. डावरीच गो.गॅब्रिएल ४, ट्रेन्ट बोल्ट नाबाद २, अवांतर १९; गोलंदाजी - शॅनन गॅब्रिएल २६-३-८०-१, केमार रोच १९-५-७३-३, मिगेल कमिन्स २४-७-७४-२, जेसन होल्डर २७-७-८५-१, रोस्टन चेस २३-२-८३-२, क्रेग ब्रेथवेट ८-०-४६-०.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कॉलिनच्या शतकाने न्यूझीलंड सुस्थितीत, वेस्ट इंडिजची गोलंदाजी निष्प्रभ
कॉलिनच्या शतकाने न्यूझीलंड सुस्थितीत, वेस्ट इंडिजची गोलंदाजी निष्प्रभ
अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रॅँडहोमच्या जलद शतकाच्या जोरावर न्यूझीलंंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपली बाजू भक्कम केली. कॉलिनने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा चौफेर समाचार घेत फक्त ७१ चेंडूत शतक झळकावले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 3:29 AM