बेंगळुरू : सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालच्या नाबाद २२० धावांच्या खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर रविवारी २ बाद ४११ धावांची मजल मारली आणि आपली पकड मजबूत केली. दुसºया दिवशीचा खेळ थांबला त्या वेळी भारत ‘अ’ संघाने १६५ धावांची आघाडी घेतली होती आणि त्यांच्या ८ विकेट शिल्लक होत्या. आज दिवसअखेर द्विशतकी खेळी करणाºया अग्रवालला कर्णधार श्रेयस अय्यर (९) साथ देत होता.त्याआधी, कालच्या ८ बाद २४६ धावसंख्येवरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला आज धावसंख्येत भर घालता आली नाही. तीन चेंडूंच्या अंतरात त्यांनी दोन विकेट गमावल्या. मोहम्मद सिराने (५-५६) आज पहिल्या चेंडूवर बेयुरन हेंड्रिक्सला बाद केले आणि तिसºया चेंडूवर डुआने ओलिवियरला तंबूचा मार्ग दाखविला.भारताच्या वेगवान गोलंदाजांनी ९ बळी घेतले. त्यात पाच बळी घेणाºया सिराजव्यतिरिक्त नवदीप सैनी (२-४७) आणि रजनीश गुरबानी (२-४७) यांनीही चांगला मारा केला. लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने एक बळी घेतला.>आक्रमक सुरुवातभारत ‘अ’ संघाने आपल्या डावाची सुरुवात आक्रमक केली. शॉ व अग्रवाल यांनी वेगाने धावा फटकावत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना ५८ व्या षटकापर्यंत यश मिळू दिले नाही. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला पहिले यश डेन पीटने (५६ धावात १ बळी) पृथ्वी शॉला क्लिन बोल्ड करीत मिळवून दिले. संघाला दुसरे यश ओलिवियर (१-६९) याने मिळवून दिले. त्याने समर्थला बाद केले.
> अग्रवालने सलामीला पृथ्वी शॉसोबत (१३६) २७७ धावांची भागीदारी केली. शॉने १९६ चेंडूंना सामोरे जाताना १३६ धावा फटकावल्या. त्याने शतकी खेळीत २० चौकार १ षटकार लगावला. अग्रवालने २५० चेंडूंना सामोरे जाताना ३१ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद २२० धावा केल्या. त्याने रविकुमार समर्थसोबत (३७) दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली.