Join us  

Mumbai Indians फ्रँचायझीच्या दोन नवीन संघांची नावं जाहीर, जाणून घ्या कोणत्या नावनं आफ्रिका व दुबईत खेळणार

आता MI Family दक्षिण आफ्रिका आणि युएई येथे होणाऱ्या लीगमध्येही खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 1:43 PM

Open in App

रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे मालकी हक्क असलेल्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक ५ जेतेपदं जिंकून आपला दबदबा कायम राखला आहे. आता MI Family दक्षिण आफ्रिका आणि युएई येथे होणाऱ्या लीगमध्येही खेळणार आहे. काही महिन्यांपूर्वी रिलायन्सकडून याबाबतची मोठी घोषणा करण्यात आली होती. UAE आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीग व क्रिकेट दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये रिलायन्सने दोन संघ खरेदी केले आहेत. त्या दोन्ही संघांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. 'MI Emirates' या नावाने यूएई आंतरराष्ट्रीय लीगमध्ये फ्रँचायझी मैदानावर उतरणार आहे,  तर आफ्रिकेतील लीगमधील संघाचं नाव 'MI Cape Town' असे असणार आहे.  

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या लीगमध्ये मुंबई इंडियन्सने केपटाउनमध्ये आपला संघ बनवण्यास पसंती दर्शवली आहे. आयपीएमधील सर्वांत लोकप्रिय असलेल्या चेन्नईच्या फ्रँचायझीला जोहान्सबर्गची फ्रँचायझी मिळवली आहे.  दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक जिंदाल यांचा संघ प्रिटोरियातील सेंच्युरियन हा आहे. जिथे त्याला प्रिटोरिया कॅपिटल्स म्हटलं जाईल. तसेच संजीव गोएंका यांचा कल डरबनकडे होता. उर्वरित दोन शहरांपैकी सनरायझर्स हैदराबाद पोर्ट एलिझाबेथ असू शकते तर राजस्थान रॉयल्सला पार्लची फ्रँचायझी मिळाली आहे.'

रिलायन्सचे  संचालक अंबानी यांनी म्हटले की, One Family मध्ये MI Emirates व MI Cape Town यांचे स्वागत करताना आनंद होतोय. आमच्यासाठी MI चे महत्त्व क्रिकेट पलिकडचे आहे. हे दोन नवीन संघ आमची विजयी परंपरा कायम राखतील याची मला खात्री आहे. 

 

टॅग्स :मुंबई इंडियन्सरिलायन्स
Open in App