MI vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या मोसमातील शुक्रवारी झालेल्या सामन्यात चुरस पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के दिले. KKRचा निम्मा संघ ६१ धावांत परतल्यानंतर नवनियुक्त कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी KKRचा डाव सावरला अन् समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, क्विंटन डी' कॉक ( Quinton de Kock) चा झंझावात KKRच्या गोलंदाजांना रोखता आला नाही. रोहित शर्मासह त्यानं रचलेल्या मजबूत पायानंतर मुंबई इंडियन्सला विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. या विजयासह मुंबई इंडियन्सनं पुन्हा Point Tableवर अव्वल स्थान गाठले.
शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. पण, दोघांची १८ धावांची भागीदारी ट्रेंट बोल्टनं संपुष्टात आणली. पॉईंटवर उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Surykumar yadav) स्टनर कॅच घेतला. नितिश राणाही ( ५) धावांवर कोल्टर नायलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. संकटात सापडलेल्या KKRचा पाय राहुल चहरनं ( Rahul Chahar) आणखी खोलात टाकला. त्यानं शुबमन गिल आणि दिनेश कार्तिक यांना सलग दोन चेंडूंत बाद केले. आंद्रे रसेलला आज मोठी खेळी करण्याची संधी होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही होता, परंतु जसप्रीत बुमराहनं चतुराईनं त्याला ( १२) बाद केलं.
नवनियुक्त कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी KKRच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना KKRला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पॅट कमिन्सला मिळालेलं जीवदान MIसाठी महागात पडले. कमिन्सनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. ५ बाद ६१ अशा संकटात सापडलेल्या KKRला कमिन्स-मॉर्गन जोडीनं बाहेर काढलं. KKRनं २० षटकांत ५ बाद १४८ धावा केल्या. कमिन्स ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननंही २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा व क्विंटन डी'कॉक यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी संघाला ५.४ षटकांत अर्धशतकी पल्ला गाठून दिला. क्विंटननं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. शिवम मावीनं KKRला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं रोहित शर्माला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककरवी झेलबाद केलं. रोहितनं ३५ धावा केल्या. रोहित-क्विंटन यांनी पहिल्या विकेटसाठई ९४ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवचा ( १०) त्रिफळा उडवून वरुण चक्रवर्थीनं KKRच्या आशा पल्लवीत केल्या. पण, क्विंटनचा झंझावात ते रोखू शकलं नाही. मुंबईनं ८ विकेट्स राखून हा विजय मिळवला.
क्विंटन डी कॉकनं ४४ चेडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या, हार्दिक पांड्यानं ११ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २१ धावा करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.
Web Title: MI vs KKR Latest News: Quinton D'Cock's storm; Mumbai Indians beat Kolkata Knight Riders by 8 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.