नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध महिला विश्व टी-२० उपांत्य लढतीत संघातील सर्वांत सीनिअर खेळाडू मिताली राजला वादग्रस्त पद्धतीने संघात स्थान न मिळाल्यामुळे प्रशासकांची समिती (सीओए) कर्णधार हरमनप्रीत व मिताली यांना पाचारण करू शकते.
भारताला उपांत्य लढतीत इंग्लंडविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या मते मिताली आपले लिखित उत्तर क्रिकेट संचालन महाव्यवस्थापक साबा करीम यांच्याकडे सोपवू शकते. ते महिला क्रिकेटचे प्रभारी आहेत.खेळाडूंचे एजंट संघाच्या निवडीबाबत बेताल वक्तव्य करीत असल्यामुळे सीओएप्रमुख विनोद राय नाराज आहेत. राय म्हणाले, ‘भारतीय महिला संघासोबत जुळलेले असल्याचे दिसत असणाºया लोकांचे वक्तव्य चिंता म्हणून बघण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करणे आवश्यक नव्हते.’
राय यांचे वक्तव्य अनिशा गुप्ता नावाच्या महिलेच्या टिष्ट्वटच्यासंदर्भात होते. तिने दावा केला होता, की ती फ्री लान्स पत्रकार असून मितालीसाठी जाहिरात आणते. त्यानंतर डीलिट करण्यात आलेल्या टिष्ट्वटमध्ये अनिशाने हरमनप्रीतला ‘धोकेबाज, खोटारडी व अयोग्य’ असल्याचे संबोधले होते.
सीओएप्रमुख म्हणाले, ‘खेळाडूंच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बीसीसीआयकडे क्रमानुसार अधिकारी आहेत. ते यासाठी समर्पित आहेत.’ राय यांनी महिला संघासोबत जुळलेल्या लोकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राय म्हणाले, ‘सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि त्याच्यासोबत जुळलेल्या लोकांनी शिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक आहे.’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाच्या निवडीमध्ये झालेल्या कथित भेदभाव प्रकरणावर लक्ष देण्यात येणार आहे. वन-डे व टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभय कर्णधारांदरम्यान असलेल्या वादग्रस्त संबंधांची भारतीय क्रिकेट जगताला चांगली कल्पना आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)