Join us  

मिचेल मार्शची 'युवराज'च्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री; IPL मध्ये सहा फलंदाजांना जमलाय हा विक्रम

मार्शने ३९ चेंडूंत एक चौकार व सहा षटकारांसह ६३ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 12:25 PM

Open in App

अभिषेक शर्मा, एन्रिच क्लासेन यांची शानदार अर्धशतके आणि गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत केलेला प्रभावी मारा याच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये शनिवारी दिल्ली कॅपिटल्सला नऊ धावांनी पराभूत केले. हैदराबादचा हा आठ सामन्यांतील तिसरा विजय ठरला.

नाणेफेक जिंकून फलंदाजी प्रथम करताना हैदराबादने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० षटकांत ६ बाद १९७ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटकांत सहा बाद १८८ धावांवर रोखून हैदराबादने विजय मिळवला. विजयासाठी १९८ धावांच्या आव्हानासमोर दिल्लीची सुरुवात खराब झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (0) झटपट बाद झाला. त्यानंतर फिल सॉल्ट (५९) आणि मिशेल मार्श (६३) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १११ धावांची भागीदारी करत संघाला भक्कम स्थितीत नेले.

मिचेल मार्शने ३९ चेंडूंत एक चौकार व सहा षटकारांसह ६३ धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना मिचेल मार्शने २७ धावांत सर्वाधिक चार गडी बाद केले. या कामगिरीसह मिचेल मार्शची 'युवराज'च्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. आयपीएल सामन्यात ५०+ धावा करणारा आणि ४ विकेट घेणारा मिशेल मार्श हा केवळ पाचवा खेळाडू बनला आहे.

Valthaty 75 & 4/29 v CSK 2011Yuvraj 66* & 4/29 v DD 2011Pollard 64 & 4/44 v RR 2012Yuvraj 83 & 4/35 v RR 2014Duminy 54 & 4/17 v SRH 2015Marsh 63 & 4/27 v SRH 2023

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्ससनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२३
Open in App