प्रॉव्हिडेन्स(गयाना): महिला टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकने दिलेल्या 133 धावांचे लक्ष्य भारताने 7 गडी राखून पूर्ण केलं. भारताकडून मिथाली राजने 47 चेंडूत 56 धावांची शानदार खेळी केली. तर स्मृती मंधनाने 28 चेंडूत 26 धावा केल्या. त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला.
कर्णधार हरमनप्रीत कौरने 13 चेंडूत 14 धावांची नाबाद खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह टीम इंडियाने पहिले दोन्ही सामने जिंकून आपला आत्मविश्वास दाखवून दिला आहे. सलामीच्या सामन्यात शानदार विजय नोंदविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक टी-20 त आज रविवारी पाकिस्तानाविरुद्ध सहजच विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार हरमनप्रीत कौरने 51 चेंडूत 103 धावा फटकवून 34 धावांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. ही लय कायम राखून भारताने आज पाकला नमवले
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 133 धावांचे ठेवले होते. पाकिस्तानकडून बिसमाह मारुफने 49 चेंडूत 53 तर निदा दरने 35 चेंडूत तडाखेबंद 52 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावा करता आल्या. भारताकडून डी. हेमलता आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर ए. रेड्डीने एक गडी बाद केला.
Web Title: Mithali's half-century, India's winning victory over Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.