Join us  

पाकिस्तानचं कौतुक करणं कैफला महागात पडलं, 'देशप्रेमी' नेटकऱ्यांनी सुनावलं!

फखर झमनच्या ९१ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 4:31 PM

Open in App

नवी दिल्लीः ऑस्ट्रेलियाला नमवून झिम्बाब्वेतील तिरंगी टी-२० मालिका जिंकणाऱ्या पाकिस्तानचं कौतुक केल्यानं टीम इंडियाचा माजी शिलेदार मोहम्मद कैफ 'ट्रोल' झाला आहे. त्याचं हे पाकिस्तानप्रेम अनेक नेटिझन्सना खटकलंय आणि त्यांनी कैफला खडे बोल सुनावलेत. अर्थात, क्रिकेटकडे खेळ म्हणून बघा, असं म्हणत काही जण त्याच्या बचावासाठीही धावून आलेत. 

फखर झमनच्या ९१ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला आणि सलग नववी टी-२० मालिका जिंकली. स्वाभाविकच, कर्णधार सरफराज अहमदच्या शिलेदारांचं क्रिकेटविश्वात कौतुक होतंय. हा सामना पाहून मोहम्मद कैफही बहुतेक भलताच प्रभावित झाला. त्याने ट्विटरवरून पाकिस्तानची पाठ थोपटली. फखर झमनच्या खेळीचं त्यानं भरभरून कौतुक केलं. 

मोहम्मद कैफचं हे ट्विट पाहून काही नेटकरी भलतेच आक्रमक झाले. त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत कैफचा समाचार घेतला.

टॅग्स :क्रिकेटआॅस्ट्रेलियापाकिस्तान