कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) गुरुवारी सेंट ल्युसीआ झौक्सचा फिरकीपटू मोहम्मद नबीनं पराक्रमी कामगिरी केली. त्याच्या फिरकीसमोर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. पॅट्रीओट्स संघाला 20 षटकांत 9 बाद 110 धावा करता आल्या.
मोहम्मद नबीनं पॅट्रीओट्सचा निम्मा संघ माघारी पाठवला. 264 सामने आणि 10 वर्षांच्या कारकिर्दीत नबीनं प्रथमच ट्वेंटी-20त पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानं 4 षटकांत 15 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. बेन डंकने 33 धावांची खेळी करताना पॅट्रीओट्सकडून सर्वाधिक धावा चोपल्या. त्यानंतर अल्झारी जोसेफनं नाबाद 21 धावांची खेळी केली.
मोहम्मद नबीनं पाच ट्वेंटी-20 लीगमध्ये एका सामन्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पाकिस्तानच्या सोहेल तन्वीर ( 5) याच्यानंतर अशी कामगिरी करणारा नबी हा दुसरा खेळाडू ठरला. नबीनं बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये 24 धावांत 4, अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये 12 धावांत 4 , बिग बॅश लीगमध्ये 25 धावांत 4, आयपीएलमध्ये 11 धावांत 4 आणि कॅरेबियन लीगमध्ये 15 धावांत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची अन्य संघांनी घेतली धास्ती; बिग बॅश लीग गाजवणारा गोलंदाज ताफ्यात दाखल
IPL 2020 : मुंबई इंडियन्स अन् KKR ला झटका; खेळाडूंना 7 नव्हे तर 14 दिवसांसाठी व्हावे लागले क्वारंटाईन
'विरुष्का'नं दिली गोड बातमी अन् इथे नेटिझन्सनी लगावला मीम्सचा मास्टर स्ट्रोक!
IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!
Web Title: Mohammad Nabi became a first player to register a 5 wicket haul in CPL 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.