ठळक मुद्देशामीने देशाला धोका दिल्याचे हसीनने वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शामीची बाजू मांडली होती. शामी हा कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले होते.
कराची : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्यांची पत्नी हसीन जहाँने काही गंभीर आरोप केले होते. यामध्ये शामीची पाकिस्तानच्या अलिश्बाबरोबर अनैतिक संबंध आहेत आणि तिच्याकडून पैसे घेऊन तो देशाची फसवणूक करत आहे, असा आरोप केला होता. पण अलिश्बाने मात्र हे आरोप बिनबुडाचे आबेत, असे म्हटले आहे.
शामीने देशाला धोका दिल्याचे हसीनने वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शामीची बाजू मांडली होती. शामी हा कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले होते. पण हसीनने आरोप केल्यावर बीसीसीआयने ते गंभीरपणे घेतले होते. वार्षिक करारामध्येही बीसीसीआयने शामीला वगळले आहे. शामीची मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली चौकशीही करण्यात आली होती. पण या चौकशीनंतर शामीचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग बीसीसीआयने मोकळा केला होता. त्यानुसार या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे बीसीसीआयला वाटत असावे.
याबाबत अलिश्बा म्हणाली की, " शामीवर मॅच फिक्सींचे लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. शामी कधीही भारताशी गद्दारी करू शकत नाही. जर या बाबत कुणाला माझी चौकशी करायची असेल, तर त्यासाठी मी कधीही तयार आहे. कारण जी गोष्ट कधीच घडली नाही, त्याबाबत जर कुणी चुकीचे वक्तव्य करत असेल तर ते मी खपवून घेणार नाही."
Web Title: Mohammed Shami can never betray India; Pakistan's Alishaba disclosures
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.