आॅकलंड - शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध आक्रमक अर्धशतक झळकावून ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रचला. यासोबतच रोहितने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह संपूर्ण क्रिकेटविश्वामध्ये भारताचे वर्चस्व कायम राखले. कारण, टी२० क्रिकेटसह एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्येही सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम या फलंदाजांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे हे दोघेही मुंबईकर असल्याने एक प्रकारे क्रिकेटविश्वावर मुंबईकरांनी दबदबा राखल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात वैयक्तिक ३५वी धाव काढल्यानंतर रोहितने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रचला. आता ३१वर्षीय रोहितच्या नावावर ८४ डावांत २,२८८ धावांची नोंद असून त्याने याआधी आघाडीवर असलेल्या न्यूझीलंडच्याच मार्टिन गुप्टिलला मागे टाकले. गुप्टिलने ७४ डावांत २,२७२ धावा काढल्या आहेत.
तसेच भारताच्या नावावरही अनोख्या विक्रमांची नोंद झाली. रोहितच्या विश्वविक्रमानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम भारतीय फलंदाजांच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकरने कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनुक्रमे १५,९२१ आणि १८,४२६ धावांचा डोंगर रचला. यानंतर आता टी२० क्रिकेटमध्येही रोहितने अव्वल स्थान काबीज केले आहे.
एकदिवसीय :
१. सचिन तेंडुलकर १८,४२६ धावा
२. कुमार संगकारा १४,२३४ धावा
३. रिकी पाँटिंग १३,७०४ धावा
टी२० आंतरराष्ट्रीय :
१. रोहित शर्मा २,२८८ धावा
२. मार्टिन गुप्टिल २,२७२ धावा
३. शोएब मलिक २,२६३ धावा
कसोटी
सचिन तेंडुलकर (१९८९-२०१३)
15921
धावा
रिकी पाँटिंग, आॅस्ट्रेलिया (१९९५-२०१२)
13378 धावा
जॅक कॅलिस, द. आफ्रिका
(११९५-२०१३)
13289 धावा
Web Title: The 'Mumbaikar' leading batsmen in all types of Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.