भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं आज 'फ्रेंडशीप डे'च्या निमित्तानं ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्याला जर्सी क्रमांक निवडण्यामागचं कारण विचारलं. 2007पासून रोहित शर्मा 45 क्रमांकाची जर्सी घालतो. त्यामागचं कारण त्यानं सांगितलं.
...तर सेहवागला हॉटेलमध्येही जाऊन मारलं असतं, शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान
टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माचा जन्म नागपूरच्या बनसोड येथे झाला. त्याचे वडील सुतारकाम करायचे. त्याच्या काकांनी त्याला मुंबईत आणले आणि तेथून त्याच्या क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. 1999मध्ये काकांनी दिलेल्या पैश्यांमुळे तो क्रिकेट कॅम्पला गेला. हॅरिस शिल्ड आणि गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पदार्पणातच त्यानं सलामीवीर म्हणून शतक झळकावलं होतं. त्यानंतर रोहितच्या कामगिरीचा आलेख चढाच राहीला... आज संपूर्ण जग रोहितला 'हिटमॅन' म्हणून ओळखतं.
रोहितनं मुंबईत क्रिकेटचे धडे गिरवले. ट्रायलसाठी तो एक दिवस स्टेडियममध्ये पोहोचला, तेव्हा नेट्समध्ये फलंदाजाच्या ट्रायल्ससाठी मोठी रांग त्यानं पाहीली. तेव्हा त्यानं गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला आणि ऑफ स्पिन गोलंदाजीही केली. तेव्हा त्याची निवडही झाली. 2005मध्ये श्रीलंकेचा ज्युनियर संघ भारत दौऱ्यावर आला होता. 50 षटकांच्या सामन्यात रोहितच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि गोलंदाज बनण्याचं त्याचं स्वप्न अपूर्ण राहिले. पण, प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितमधील टॅलेंट ओळखले आणि त्याला फलंदाज बनण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यानं फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं आणि आज तो जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.
रोहितनं 32 कसोटी, 224 वन डे आणि 108 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 2141, 9115 आणि 2773 धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं असलेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे. तो म्हणाला,''जर्सी क्रमांक निवडण्यामागे काही कारण नाही. माझ्या आईनं मला हा क्रमांक निवडण्यास सांगितला आणि मी त्यावर चर्चा न करता तिचं म्हणणं ऐकलं. हा क्रमांक लकी ठरेल, असं तिनं सांगितलं.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आयर्लंडच्या 21 वर्षीय कर्टीस कॅम्फरनं पटकावलं दिग्गजांच्या पंक्तित स्थान!
मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत
कारगिल युद्धात भारताविरुद्ध सीमेवर लढण्यास तयार होतो; शोएब अख्तरचा दावा
हा फोटो नीट पाहा, या लहान मुलांपैकी एक आहे भारताचा महान फलंदाज!
IPL 2020 साठी महेंद्रसिंग धोनी झाला सज्ज; 'कॅप्टन कूल'चा नवा लुक व्हायरल
भाई, चर्चा तर होणारच ना!; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो