कोलंबो - श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव करत निदाहास चषकावर नाव कोरलं. या सामन्यात दिनेश कार्तिकने मोक्याच्या क्षणी तुफान फटकेबाजी करत गेलेला सामना जिंकून दिला. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना कार्तिकने जबरदस्त षटकार ठोकत सामाना जिंकला आणि क्रिडाप्रेमींनी सुटकेचा निश्वास सोडला.
भारत, बांगलादेशसह श्रीलंकेच्या चाहत्यांनीही कार्कितच्या बॅटमधून निघालेला विजयी षटकार पाहिला. पण भारतीय कर्णधार रोहित शर्माने हा विजयी षटकार पाहिला नाही. याची कबूली स्वत: रोहित शर्माने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ज्यावेळी सौम्य सरकार 20 षटकांतील शेवटचा चेंडू टाकसाठी धावत होता. त्यावेळी रोहित ड्रेसिंग रुममध्येच होता. त्यावेळी त्याच्या डोक्यात काही वेगळाच विचार सुरु होता. तो सुपर ओव्हरच्या विचारात होता. कारण त्याच्या डोक्यात होत जर सामना टाय झाला तर पुढची रणनिती काय असेल या विचारत होतो अशी कबुली त्याने दिली.
तो म्हणाला, कार्तिकने शेवटच्या चेंडूवर चौकर मारल्यास सुपर ओव्हर होण्याची शक्यता आहे. अशावेळी आपली पुढील रणनीती काय असावी याचा माझ्या डोक्यात विचार सुरु होता. त्यामुळं मी विजयी षटकार पाहू शकतो नाही. ज्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये विजयी जल्लोष सुरु झाल्यानंतर मला समजले की कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला आणि आपण चषकावर नाव कोरलं आहे.
रोहित म्हणाला की, कार्तिकला माहित होत ज्यावेळी शेवटच्या षटकात 12-15 धावा करायच्या असतात तेव्हा दबाव गोलंदाजावर असतो. आम्हाला माहित होत की दोन्ही फलंदाजामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. ते कोणत्याही क्षणी षटकारांची बरसात करु शकतात, पण शंकरला दबावात आपल्या लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही. या सामन्यापासून शंकरला खूप काही शिकायला मिळाले असेल. दबावात कशी फलंदाजी करायची हे त्याला समजले असेल. 18 षटकांमध्ये ड्रेसिंग रुममधील वातावरण कसे होतं यावर बोलताना रोहित शर्माने हसत उत्तर दिले तो म्हणाला, आमच्या डोक्यात काही विचार नव्हाता कारण मैदानावर असणारे दोन्ही फलंदाज सामना जिंकून देणार यावर आमचा विश्वास होता.
Web Title: ndia vs Bangladesh, Nidahas Trophy Final in Colombo -Captain Rohit did not see the winning sixes, because ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.