New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर एक डाव व १७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडनं पहिल्या डावात घेतलेल्या ३६२ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा दुसरा डाव १८६ धावांवर गडगडला. या विजयासह न्यूझीलंडनं कसोटी मालिका २-० अशी खिशात घातली आणि ICC कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले.
दुसरीकडे विलियम्सन खेळपट्टीवर नांगर रोवून उभाच होता. विलियम्सननं ३६४ चेंडूंत २८ चौकारांसह २३८ धावा केल्या. डॅरील मिचेलनं ११२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२ धावा करतान विलियम्सननं डाव घोषित केला. न्यूझीलंडनं ६ बाद ६५९ धावांवर डाव घोषित करून पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी घेतली.
हायलाईट्स- न्यूझीलंडनं प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.- प्रथमच त्यांनी सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.- घरच्या मैदानावर मागील १७ सामन्यांत त्यांनी अपराजित मालिका कायम राखली आहे. - २०११नंतर त्यांनी घरच्या मैदानावर एकाही कसोटीत पराभूत पत्करलेला नाही.