Join us  

धोनीच्या चाहत्यांकडून रीषभ पंतची समाजमाध्यमांवर खिल्ली

धोनी हा रीषभ पंतसारख्या युवा खेळाडूची जागा अडवत आहे, असे काही जणांनी म्हटलेही होते. पण आता पंतकडून चांगली कामिगरी न झाल्याने त्याचा चांगलाच समाचार धोनीच्या चाहत्यांनी घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 1:55 PM

Open in App
ठळक मुद्देजर ही खेळी धोनीची  असती तर त्याला बऱ्याच जणांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला असता, पण ही खेळी पंतची असल्यामुळे त्याला सावरले जात आहे.

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी एका सामन्यात जरी अपयशी ठरला तरी त्याच्यावर टीका होते. काही दिवसांपूर्वी तर धोनीने क्रिकेटमधून निवृत्त व्हावे, अशीही टीकाकारांनी चर्चा करायला सुरुवात केली होती. धोनी हा रीषभ पंतसारख्या युवा खेळाडूची जागा अडवत आहे, असे काही जणांनी म्हटलेही होते. पण आता पंतकडून चांगली कामिगरी न झाल्याने त्याचा चांगलाच समाचार धोनीच्या चाहत्यांनी घेतला आहे.

मंगळवारपासून श्रीलंकेमध्ये निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेला सुरुवात झाली. यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात पंतला 23 चेंडूंत 23 धावा करता आल्या. त्याची ही खेळी ट्वेन्टी-20 क्रिकेटसाठी योग्य नसल्याची टीका धोनीच्या चाहत्यांनी केली आहे.

ट्वेन्टी-20 सामन्यात 23 चेंडूंत 23 धावा म्हणजे 100 चा स्ट्राईकरेट आहे, त्यामुळे धोनीने आता निवृत्त व्हायला हवे. अरे सॉरी, ही रीषभ पंतची खेळी आहे का, या युवा खेळाडूपुढे फार मोठी कारकिर्द आहे, असे उपहासात्मक  वक्तव्य धोनीचा चाहता नीलकांतने समाजमाध्यमावर केले आहे. जर ही खेळी धोनीची  असती तर त्याला बऱ्याच जणांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला असता, पण ही खेळी पंतची असल्यामुळे त्याला सावरले जात आहे, असं या वक्तव्याचा अर्थ आहे.

धोनीने जर अशी खेळी साकारली असती तर त्याच्यामुळे भारताला पराभव स्वीकारायला लागला, अशी टीका बऱ्याच जणांनी केली असती. पण ही खेळी पंतने केल्यामुळे त्याच्यावर कोणतीही टीका होत नाही, असेही काही धोनीच्या चाहत्याचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८महेंद्रसिंह धोनीक्रिकेट