कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं अनेकांना मोठा धक्का दिला. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा अपूरी पडत आहे, त्यांना जाळण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. दुसऱ्या लाटेच्या तडाख्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडलेली दिसत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीरचा तुटवडा याबाबतच्या बातम्या वारंवार वाचायला मिळत आहेत. सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटींनाही याचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे. पण, देशातील परिस्थिती सुधारण्याच्या हालचाली करण्यापेक्षा राजकारणच सुरू असल्याचे दिसत आहे. त्यावरुन भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) यानं खरमरीत ट्विट केलं आहे. Israeli airstrikes on Hamas : पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह इरफान पठाणनं केला निषेध; म्हणाला, हल्ल्याचे समर्थन करता येणार नाही!
''तुम्ही ज्या पक्षासाठी भांडताय, ज्यांना पाठींबा देताय तेही मृतांना जीवंत करू शकत नाहीत,'' असे ट्विट करून इरफाननं #IndianLivesMatter हा टॅग वापरला आहे.
देशात मागील २४ तासांत ३ लाख ६२,७२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर ३ लाख ५२,१८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ४१२० जणांना प्राण गमवावे लागले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही २ कोटी ३७ लाख ०३,६६५ इतकी झाली आहे. त्यापैकी १ कोटी ९७ लाख, ३४,८२३ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या ही २ लाख ५८,१३७ इतकी आहे. आतापर्यंत १७ कोटी ७२ लाख १४,२५६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
काय म्हणाली होती कंगना?इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्याचे निषेध व्यक्त करणाऱ्या इरफानवर कंगनानं निशाणा साधला होता. तिनं लिहिलं होतं की, इरफान पठाणला दुसऱ्या देशावर एवढं प्रेम आहे, परंतु स्वतःच्या देशात बंगालमध्ये जे घडलं त्या निषेधार्त साधं एक ट्विट केलं नाही.
इरफान व युसूफ पठाण यांचं समाजकार्य
- इरफान व युसूप ही पठाण बंधूंची जोडी या काळात अनेकांसाठी खऱ्या अर्थानं संकटमोचक ठरली. मागील लॉकडाऊनमध्ये भरभरून मदत केल्यानंतर ही जोडी पुन्हा मदतीसाठी सक्रीय झाली आहे. वडोदरा पाठोपाठ आता ही जोडी दक्षिण दिल्लीत कोरोना बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याच काम करत आहेत
- गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी पठाण बंधूंनी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सनानं PPE किट्स व मास्कचे वाटपही केलं होतं. आता कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत असताना या दोघांनी वडिलांच्या नावानं सुरू असलेल्या Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरवण्याचे काम सुरू केले आहे.
- क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स ( Cricket Academy of Pathans ) च्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देणार आहेत.