NZ vs BAN, 2nd ODI : Why the Umpires are not clear with their decision ? भारत-इंग्लंड ट्वेंटी-२० मालिकेत सॉफ्ट सिग्नल ( India vs England, T20I, Soft Signal) निर्णायमुळे सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांना बाद होऊन तंबूत परतावे लागले होते. त्यावरून कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने नाराजी व्यक्त करताना अम्पायरकडे 'मला माहीत नाही', असा पर्याय का नाही, असा प्रश्न विचारला होता. ( Soft Signal'वर भडकला विराट कोहली; म्हणाला, अम्पायरकडे I don't know call हा पर्याय का नाही?) आता याच सॉफ्ट सिग्नल निर्णयाचा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Bangalore) संघातील नव्या भिडूला फटका बसला आहे. कॅच झेलल्यानंतर मैदानावरील अम्पायरनं बाद दिलं, परंतु तिसऱ्या अम्पायरनं हा निर्णय बदलला. त्यामुळे पुन्हा एकदा सॉफ्ट सिग्नल हा नियम चर्चेत आला आहे.
न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात ( NZ vs BAN, 2nd ODI ) ख्राइस्टचर्च येथे दुसरा वन डे सामना सुरू आहे. IPL 2021साठी RCBच्या ताफ्यात नव्यान दाखल होणाऱ्या कायले जेमिसननं (Kyle Jamieson) यानं घेतलेला कॅच चर्चेचा विषय ठरला आहे. बांगलादेशच्या डावातील १५व्या षटकात जेमिसननं त्याच्याच गोलंदाजीवर फलंदाज तमीम इक्बाल ( Tamim Iqbal) यानं स्ट्रेट ड्राईव्ह मारला. ६ फूट व ८ इंच उंची असलेल्या जेमिसननं खाली वाकून त्वरीत तो कॅच घेतला, पण खाली पडताना त्याचा हात जमिनीला टेकला. मैदानावरील अम्पायरनं सॉफ्ट सिग्नलनुसार तमिमला बाद दिले. पण, त्यांनी तिसऱ्या अम्पायरची मदत मागितली. India vs England T20I Series 2021: टीम इंडियानं बाजी मारली, खेळाडूंना बक्षीस रूपी किती रक्कम मिळाली माहित्येय?
काय आहे सॉफ्ट सिग्नल..मैदानावरील पंचांनी सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना नाबाद दिले असते तर सॉफ्ट सिग्नलच्या नियमानुसार तिसऱ्या अम्पायरनेही त्यांना नाबाद ठरवले असते. सॉफ्ट सिग्नल का दिला जातो, हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. याचं उत्तर आयसीसीच्या नियमात लपलं आहे. नियमानुसार जर मैदानावरील अम्पायर त्यांच्या निर्णयाबाबात निश्चित नसतील तर ते तिसऱ्या अम्पायरची मदत मागतात. पण, तसं करण्यापूर्वी सॉफ्ट सिग्नल दिला जातो. हा सिग्नल आऊट किंवा नॉट आऊटचा असतो. तिसऱ्या अम्पायरलाही निर्णय देता येत नाही तेव्हा मैदानावरील अम्पायरचा हा निर्णय अखेरचा निर्णय मानला जातो.
बांगलादेशच्या ६ बाद २७१ धावाकर्णधार तमिम इक्बाल( ७८) आणि मोहम्मद मिथून ( ७३) यांनी अर्धशतकी खेळी करताना बांगलादेशला समाधानकारक पल्ला गाठून दिला. सौम्या सरकार ( ३२), मुश्फीकर रहिम ( ३४) यांनी हातभार लावला. मिचेल सँटनरनं दोन विकेट्स घेतल्या.