भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विश्वविक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. बुमराहने नेमका कोणता पराक्रम केलाय, ते पाहा...
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. यामध्ये बुमराहचा महत्वाचा वाटा होता. कारण बुमराहने ज्याप्रकारे भारताला सुरुवात करून दिली ती यावेळी महत्वाची ठरली.
या सामन्यात सैनीबरोबर जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत सर्वाधिक तीन बळी मिळवले. बुमराहने या सामन्यात पहिलेच षटक निर्धाव टाकत भारताला यश मिळवून दिले. त्यामुळे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याचा विश्वविक्रम आता बुमराहच्या नावावर जडला गेला आहे. आतापर्यंत बुमराहने आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सात षटके निर्धाव टाकले आहेत. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराच्या नावावर होता, त्याने सहा निर्धाव षटके टाकली होती.
कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताला न्यूझीलंडपुढे १६४ धावांचे आव्हान ठेवता आले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामी कर्णधार रोहितने यावेळी संघाच्या क्रमवारीत बदल केला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. पण संजूला या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि २ धावा करून तो बाद झाला.
संजू स्वस्तात बाद झाला असला तरी त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुल यांनी संघाला डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. पण मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. पण राहुल बाद झाला असला तरी रोहितने एका बाजूने जोरदार फटकेबाजी केली. रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
न्यूझीलंडच्या खेळाडूने मैदानात येतात लिहिला इतिहास, केला मोठा पराक्रमभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरचा ट्वेन्टी-२० सामना सुरु झाल्यावर लगेचच एक मोठी गोष्ट पाहायला मिळाली. मैदानात पाय ठेवताच न्यूझीलंडच्या एका खेळाडूने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडच्या या खेळाडूने पराक्रम केला असून तो देशाचा अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.