OMG : बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला कोरोना; सिडनी कसोटीत सर्वांना मास्क बंधनकारक!

बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्टेडियमवर ३० हजार लोकं उपस्थित होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ही कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: January 6, 2021 10:50 AM2021-01-06T10:50:17+5:302021-01-06T10:50:36+5:30

whatsapp join usJoin us
OMG : Australia-India Boxing Day Test declared possible Covid hotspot; Masks mandatory for fans in Sydney   | OMG : बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला कोरोना; सिडनी कसोटीत सर्वांना मास्क बंधनकारक!

OMG : बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला कोरोना; सिडनी कसोटीत सर्वांना मास्क बंधनकारक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय खेळाडूंनी बायो-बबल नियमांच्या उल्लंघनाची चर्चा सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मेलबर्न येथे पार पडलेल्या भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या चाहत्यामुळे स्टेडियमवर उपस्थित अन्य लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मेलबर्न कसोटीतील या प्रकारानंतर सिडनी कसोटीत सर्व प्रेक्षकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या सामन्यासाठी केवळ २५ टक्केच प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी दिली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेलबर्न क्रिकेट मैदानावर येण्यापूर्वी त्या प्रेक्षकामध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. पण, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याचा कोरोना झालेल्या रुग्णाशी संपर्क आला असेल. नक्की ही लागण कशी झाली, याचा तपास सुरू आहे. या सामन्यासाठी ग्रेट साऊदर्न स्टँड झोन ५ मध्ये असलेल्या प्रेक्षकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. 

बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्टेडियमवर ३० हजार लोकं उपस्थित होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ही कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. 


 

सिडनी कसोटीत सर्वांना मास्क बंधनकारक 
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू होत आहे. मेलबर्नवरील सामन्यात कोरोना पॉझिटिव्ह प्रेक्षक सापडल्यामुळे तिसऱ्या कसोटीत सर्व प्रेक्षकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. न्यू साऊथ वेल्सचे आरोग्यमंत्री ब्रॅड हझार्ड यांनी चाहत्यांनी पूर्ण वेळ मास्क घालणे बंधनकारक असल्याचे सांगितले. सिडनी क्रिकेट ग्राऊंडची प्रेक्षकक्षमता ४८ हजार आहे आणि फक्त १० हजार प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. 

Web Title: OMG : Australia-India Boxing Day Test declared possible Covid hotspot; Masks mandatory for fans in Sydney  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.