पोर्ट एलिझाबेथ : शुक्रवारी खेळल्या जाणाºया सहाव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध आमच्या बेंच स्ट्रेंग्थला संधी मिळू शकते. पण विजयी निर्धार तसूभरही कमी होणार नाही. ही मालिका ५-१ अशीच जिंकण्याचा निर्धार भारतीय कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला आहे.भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाला ७३ धावांनी पराभूत करीत द. आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका विजय नोंदविला. कुठल्याही प्रकारात हा पहिलाच मालिका विजय ठरला. सामन्यानंतर कोहली म्हणाला,‘ही मालिका जिंकल्यानंतर आम्ही कुठे कमी पडलो याचा शांतपणे विचार करणार आहोत. सुधारणेस कुठे वाव आहे, याचाही शोध घेतला जाईल. सध्या ४-१ अशी आघाडी आहे, ही मालिका ५-१ अशीच जिंकायचीय. तथापि काही राखीव खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.’विजय मिळविण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून कोहली पुढे म्हणाला,‘आम्ही विजयासाठी प्राण पणाला लावणार यात शंका नाही.’ या मालिकेत कोहलीसह फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल तसेच कुलदीप यादव यांचे विशेष योगदान राहिले. तथापि कोहलीने मालिका विजय हा सांघिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले. मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी सेंच्युरियन येथे खेळविला जाईल. (वृत्तसंस्था)विदेशात हा सर्वांत मोठा विजय : रोहितपाचव्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेला नमवून मिळविलेला मालिका विजय हा विदेशात सर्वांत मोठा विजय असल्याचे मत भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले. रोहितने काल ११५ धावांचा धडाका केला. शतक ठोकल्यानंतर तो म्हणाला, ‘विदेशातील द्विपक्षीय मालिकेत हा सर्वांत मोठा विजय आहे. ही मालिका फारच कठीण होती. याआधी आम्ही २००७-०८ मध्ये आॅस्ट्रेलियात तिरंगी मालिका जिंकली होती. दोन्ही मालिकांमध्ये तुलना मात्र करणार नाही. ही मालिका आमच्यासाठी विशेष आहे. विपरीत परिस्थितीत सर्व खेळाडूंनी वर्चस्व रााखून विजय अविस्मरणीय ठरविला.’‘२५ वर्षांनंतर आम्ही द. आफ्रिकेत मालिका जिंकल्याने हा विजय सर्वांत वर असेल. याचे सर्व श्रेय खेळाडूंना जाते. ज्यांना संधी मिळाली त्या खेळाडूने आव्हान स्वीकारले. एकदिवसीय मालिकेत तर आम्ही वर्चस्व गाजविले. यामुळे पुढील दौºयात आमचा आत्मविश्वास उंचावणार आहे. कसोटीत आम्ही १-२ ने हरलो तरी ती मालिका एकतर्फी नव्हतीच,’ असेही रोहितने स्पष्ट केले.फॉर्मवरून विचारलेल्या प्रश्नाला रोहितने खोचक उत्तर दिले. ‘पहिल्या सामन्यांत मला चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ तीन सामन्यांमधील कामगिरीनंतर तुम्ही माझी कामगिरी कशी कमी ठरवू शकता?’, अशी विचारणा त्याने केली.पराभवासाठी कुठलाही बहाणा नाही - गिब्सनवन डे मालिकेतील पराभवासाठी कुठलाही बहाणा करणार नसल्याचे मत द. आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी व्यक्त केले आहे. पुढील वाटचालीआधी फार विचार करण्याची हीच वेळ असल्याचे त्यांचे मत होते. पत्रकार परिषदेत गिब्सन म्हणाले, ‘बहाणा न शोधता चांगली कामगिरी करण्याचे प्रयत्न करु या,असे मी खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये बजावले होते. भारताकडून झालेल्या पराभवानंतर पुढील वाटचालीआधी विचार करण्यास भाग पडले आहे.’ विशेष म्हणजे, ‘जो संघ तुम्ही पाहिला तो विश्वचषकात खेळेल, असे वाटत नाही,’ असेही गिब्सन यांनी यावेळी स्पष्ट केले. कुलदीप व चहल यांच्या फिरकीपुढे फलंदाजीचे पितळ उघडे पडले आहे. भारताला दोन्ही गोलंदाज विश्वचषकात लाभदायी ठरू शकतील, असे सांगून गिब्सन पुढे म्हणाले,‘भारताकडे जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. आम्ही त्यांना खेळण्याचा प्रयत्नही केला नाही.’कसोटीत वाटचाल सकारात्मक नव्हती - पॉलकभारताने एकदिवसीय मालिका जिंकली असली तरी त्याआधी झालेल्या कसोटी मालिकेत या संघाची वागणूक सकारात्मक नव्हती, अशी टीका द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पॉलक याने केली आहे. तयारीविना उतरलेला भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळला त्यावर मी निराश झालो. कसोटी जिंकण्याची पाहुण्यांची कुठलीही तयारी दिसली नाही. तयारी करण्यासाठी भारताने फार आधी द. आफ्रिकेत दाखल व्हायला हवे होते. तुमचे लक्ष्य काय आणि ते मिळविण्यासाठी तुम्ही काय तयारी केली याला फार महत्त्व असते. देशाबाहेर मालिका जिंकायची असेल तर त्यादृष्टीने तयारीला प्राधान्यक्रम द्यायलाच हवा, असे पॉलक यांचे मत आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वन-डे मालिका ५-१ ने जिंकू - विराट कोहली; बेंच स्ट्रेंग्थला संधी पण विजयी निर्धार ढळणार नाहीच
वन-डे मालिका ५-१ ने जिंकू - विराट कोहली; बेंच स्ट्रेंग्थला संधी पण विजयी निर्धार ढळणार नाहीच
शुक्रवारी खेळल्या जाणाºया सहाव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध आमच्या बेंच स्ट्रेंग्थला संधी मिळू शकते. पण विजयी निर्धार तसूभरही कमी होणार नाही. ही मालिका ५-१ अशीच जिंकण्याचा निर्धार भारतीय कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 6:34 AM