भारताला लंकेवर सर्वाधिक विजय नोंदविण्याची संधी

टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:35 AM2021-07-06T09:35:41+5:302021-07-06T09:36:24+5:30

whatsapp join usJoin us
Opportunity for India to record the most victory over Sri Lanka | भारताला लंकेवर सर्वाधिक विजय नोंदविण्याची संधी

भारताला लंकेवर सर्वाधिक विजय नोंदविण्याची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारताचा संंघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. या काळात भारताकडे लंकेविरुद्ध सर्वाधिक वन डे जिंकणारा संघ बनण्याची संधी असणार आहे. त्यासाठी दोन विजयांची गरज असेल. पाकिस्तानने लंकेविरुद्ध सर्वाधिक ९२ विजय मिळविले आहेत.

टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.

लंकेविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारे संघ -
संघ                सामने     विजय
पाकिस्तान     १५५     ९२
भारत      १५९     ९१
ऑस्ट्रेलिया     ८७     ६१
न्यूझीलंड     ९९     ५९
द. आफ्रिका     ७७     ४४

Web Title: Opportunity for India to record the most victory over Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.