Join us  

भारताला लंकेवर सर्वाधिक विजय नोंदविण्याची संधी

टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 9:35 AM

Open in App

कोलंबो : शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारताचा संंघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. या काळात भारताकडे लंकेविरुद्ध सर्वाधिक वन डे जिंकणारा संघ बनण्याची संधी असणार आहे. त्यासाठी दोन विजयांची गरज असेल. पाकिस्तानने लंकेविरुद्ध सर्वाधिक ९२ विजय मिळविले आहेत.

टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.

लंकेविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारे संघ -संघ                सामने     विजयपाकिस्तान     १५५     ९२भारत      १५९     ९१ऑस्ट्रेलिया     ८७     ६१न्यूझीलंड     ९९     ५९द. आफ्रिका     ७७     ४४

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघशिखर धवनश्रीलंका