Pakistan Captain Babar Azam Gun Photo: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचं युद्ध हे कायमच बहुचर्चित असते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा सध्याच्या घडीचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विल्यमसन यांच्या पंगतीत हल्ली बाबर आझमचे नाव घेतले जाते. बाबर आझमने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेकदा स्वत:ला सिद्धदेखील केले आहे. पण सध्या मात्र बाबर आझम चुकीच्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. हातात बंदुक घेऊन फोटो पोस्ट केल्याने त्याच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मोबाईल गेमची जाहिरात करताना बंदुकीसह फोटो पोस्ट केल्याने खूपच ट्रोल झाला आहे. ८ एप्रिलला बाबर आझमने मोबाईल गेम 'फ्रीफायर'ची जाहिरात करताना स्वत:च्या हातात स्वयंचलित बंदूक घेतलेला एक फोटो पोस्ट केला. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याने लिहिले की, “@FreefirePkyt सोबत काहीतरी खूप रोमांचक येत आहे! जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेल्या बॅटल रॉयल गेमबाबत जाणून घेण्यासाठी संपर्कात राहा.
बाबरने ही पोस्ट जाहिरात म्हणून शेअर केली होती. पण पाकिस्तानी कर्णधाराची ही मजा त्याच्या अंगलट आली आणि त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. ट्वीटरवर त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं.
--
--
--
दरम्यान, बाबरने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात ऐतिहासिक मालिकेत पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले. त्यात ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका १-० ने जिंकली. बाबरने आतापर्यंत ४० कसोटींमध्ये ६ शतकांसह २ हजार ८५१ केल्या आहेत.