कराची - 2009 मध्ये पाकिस्तान दौर्यावर आलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघातील खेळाडूवर गद्दाफी स्टेडियमच्या बाहेर अज्ञात नागरीकांनी गोळीबार केला. त्यात जयवर्धने व संगकारासह सात खेळाडू जखमी झाले होते. या घटनेनंतर कोणताही देश पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास तयार नव्हता. पण नऊ नर्षानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिज संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना काल झाला. या सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 143 धावांनी दारुण पराभव केला.
तब्बल 9 वर्षानी देशात आंतरराष्ट्रीय क्रिकट परतल्यामुळं क्रीडाप्रेमींच्या आनंदाला पारवार नव्हते. स्टेडियममध्ये मोठ्या संखेनं प्रेक्षकांमी हजेरी लावली होती. आपल्या संघाच्या विजय त्यांनी साजरा केला. पण काल झालेल्या या समान्यात पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद नवाजने पाहुण्या संघातील खेळाडूला अपशब्द म्हणत डिवचल्याचे पहायला मिळाले. मोहम्मद नवाजने काल ज्यापद्धतीने मैदानात वावर केला ते आतिशय निराशजन होतं. 204 धावांच्या आव्हाना पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाने दमदार सुरुवात केली होती. सलामीवीर फलंदाज वाल्टने पहिल्या षटाकातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात वाल्टन बाद झाला. वाल्टन बाद झाल्यानंतर मोहम्मद नवाजने त्याला शिवीगाळ केली. वाल्टनसाठी मोहम्मद नवाजने खूपच अर्वाच्य शब्दांचा वापर केला. त्यामुळं पाकिस्तानी क्रीडाप्रेमीमध्ये त्याच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. आयसीसीने आशा घटनेबद्दल कठोर कारवाई करायला हवी आशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 203 धावांचा डोंगर उभारला होता. फखार जजमान(39), हुसैन तलत(41), सरफराज अहमद(38) आणि शोएब मलिकने (37) दमदार खेळी करत संघाला 203 धावांपर्यंत पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली. 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान पाकिस्तानने वेस्ट इंडिजला अवघ्या 60 धावांत रोखलं. पाकिस्तानाचा हा टी -20 मधील सर्वात मोठा विजय आहे. पाकिस्तान संघ सध्या टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
Web Title: Pakistani players' abusive behavior.ICC should take some actions on these players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.