फोटोत दिसणारा चिमुरडा भारतीय संघातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याच्या नावावर 32 कसोटी, 224 वन डे आणि 104 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये हा चिमुरडा सध्या आघाडीवर आहे. क्रिकेटविश्वातील असे अनेक विक्रम त्यानं मोडले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही या खेळाडूनं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आता तरी तुम्हाला समजलं असेल हा खेळाडू कोण ते?चला आणखी क्लू देतो... हा खेळाडू मुक्या प्राण्यांसाठी सतत सोशल मीडियावर मदतीची साद घालत असतो. प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या पेटा या संस्थेचा तो सदस्य आहे आणि वर्ल्ड वाईल्ड फेडरेशन - इंडियाच्या एक शिंगी गेंड्यांचा तो सदिच्छादूत आहे आणि त्याच्या मुलीचं नाव एका गेंड्याला देण्यात आले आहे. अजूनही नाही ओळखलंत?नागपूरच्या बनसोड येथे त्याचा जन्म. त्याचे वडील सुतारकाम करायचे. त्याच्या काकांनी त्याला मुंबईत आणले आणि तेथून त्याच्या क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. 1999मध्ये काकांनी दिलेल्या पैश्यांमुळे तो क्रिकेट कॅम्पला गेला. हॅरिस शिल्ड आणि गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पदार्पणातच त्यानं सलामीवीर म्हणून शतक झळकावलं होतं.चला आता संगूनच टाकतो... आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 2019मधील वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानं गौरविलेल्या रोहित शर्माचा हा बालपणीचा फोटो आहे. त्यात त्याचे वडील गुरूनाथ आणि आई पुर्णिमा दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक नावावर करणारा एकमेव फलंदाज असलेल्या रोहितला हिटमॅन म्हणूनही ओळखले जाते.
त्यानं 32 कसोटीत 46.54च्या सरासरीनं 2141 धावा केल्या आहेत. 212 ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम खेळी आहे. 224 वन डे सामन्यांत त्याच्या नावावर 49.27 च्या सरासरीनं 9115 धावा आहेत आणि त्यात 29 शतकं व 43 अर्धशतकांचा समावेश आहे. 104 ट्वेंटी-20त त्यानं 4 शतकांसह 2633 धावा चोपल्या आहेत.