चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13 व्या मोसमातून माघार घेतली. वैयक्तिक कारणास्तव त्यानं ही माघार घेतल्याचे CSKच्या सीईओंनी सांगितलं. दुबईहून मायदेशात परतण्यामागे रैनाचं नेमकं कारण काय, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान रैनाच्या आत्याच्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आणि त्यात काकांचं निधन झाले. मंगळवारी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आत्ये भावानेही प्राण गमावले. रैनानं या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी पंजाब पोलिसांकडे केली आहे.
IPL 2020 : CSK बाबतीतचं वृत्त चुकीचं; दोन खेळाडूंसह 13 सदस्य अजूनही कोरोना पॉझिटिव्ह
''पंजाबमध्ये माझ्या कुटुंबीयांसोबत जे घडलं ते अत्यंत भयानक होतं. माझ्या काकांची कत्तल करण्यात आली, माझी आत्या आणि दोन आत्येभाऊ हे गंभीर जखमी झाले. दुर्दैवानं काल रात्री एका आत्ये भावाचंही निधन झालं. आत्येची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे आणि ती लाईफ सपोर्टवर आहे,''असे रैनानं ट्विट केलं.
IPL 2020 : Bio-Bubble नियमांचं पालन करा; इथे खेळायला आलोय, मजा करायला नाही - विराट कोहली
त्यानं पुढे लिहिलं की,''त्या रात्री नेमकं काय घडलं आणि कुणी केलं हे आतापर्यंत तरी आम्हाला कळलेलं नाही. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावं, ही विनंती. हे भयंकर कृत्य कोणी केलं याची माहिती आम्हाला मिळायलाच हवी. अशा आरोपींना आणखी अपराध करण्यासाठी मोकळं सोडता कामा नये.''
आठ फ्रँचायझींच्या ताफ्यात नवे भीडू; जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणता नवीन खेळाडू खेळणार
रैना पळू नकोस!; सुरेश रैनाची आयपीएलमधून माघार अन् जोफ्रा आर्चरचं ट्विट व्हायरल
IPL 2020 : RCBनं मोठा डाव खेळला; केन रिचर्डसनला बदली म्हणून 'भारी' खेळाडू निवडला