Join us  

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ याची आणखी एक वादळी खेळी; नोंदवला विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांनाही न जमलेला विक्रम 

Prithvi Shaw in Vijay Hazare 2021: Not Virat Kohli nor MS Dhoni achieved THIS record

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 3:28 PM

Open in App
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडलाविजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही पृथ्वीच्या नावावर

मुंबई संघाच कर्णधार पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याच जबरदस्त फॉर्म विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही पाहायला मिळाला. मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश ( Mumbai Vs Uttar Pradesh) यांच्यातल्या फायनल लढतीत पृथ्वी क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याला दोन सहकाऱ्यांनी उचलून मैदानाबाहेर नेले. त्यामुळे तो फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार की नाही, याबाबत शांसकता होती. पण, तो आला अन् वादळा सारखा खेळून उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करून गेलाही. पृथ्वीनं पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी करून विजय हजारे ट्रॉफीत आतापर्यंत विराट कोहली ( Virat Kohli), महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यांच्यासह एकाही फलंदाजाला न जमलेला विक्रम नावावर केला. ( Not Virat Kohli nor MS Dhoni achieved THIS record ) 

प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघानं ४ बाद ३१२ धावांचा डोंगर उभा केला. माधव कौशिक यानं १५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारासह १५८ धावा केल्या. समर्थ सिंग ( ५५) आणि अक्ष दीप नाथ ( ५५) यांच्या अर्धशतकानं उत्तर प्रदेशला मोठा पल्ला गाठून देण्यात हातभार लावला. दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ ( Mumbai Captain Prithvi Shaw) याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं. आतापर्यंत दमदार फॉर्मात असलेल्या पृथ्वीला दुखापत झाल्यानं मुंबईचं टेंशन वाढलं होतं, परंतु तो मैदानावर उतरला अन् वादळा सारखा घोंगावला.

पृथ्वीनं ३९ चेंडूंत १० चौकार व ४ षटकार खेचून ७३ धावांची वादळी खेळी केली. शिवम मावीनं त्याला बाद केलं. पण, या खेळीच्या जोरावर पृथ्वीनं इतिहास रचला. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात ८०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानं १ द्विशतक, ३ शतकं आणि १ अर्धशतक झळकावताना या विक्रमाला गवसणी घातली.

विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज  

८२७ - पृथ्वी शॉ, २०२१७२३ - मयांक अग्रवाल, २०१८७३७ - देवदत्त पडीक्कल, २०२१  ६०९ - देवदत्त पडीक्कल, २०१९६०७ - दिनेश कार्तिक, २०१७६१३ - रविकुमार समर्थ, २०२१ 

पृथ्वी शॉची यंदाच्या पर्वातील कामगिरी ( Prithvi Shaw in Vijay Hazare 2021)१०५*( ८९) वि. दिल्ली ३४ ( ३८) वि. महाराष्ट्र२२७* ( १५२) वि. पुद्दुचेरी३६ ( ३०) वि. राजस्थान२ ( ५) वि. हिमाचल प्रदेश१८५* ( १२३) वि. सौराष्ट्र ( उपांत्यपूर्व फेरी)१६५ ( १२२) वि. कर्नाटक ( उपांत्य फेरी)  ७३ ( ३९) वि. उत्तर प्रदेश ( अंतिम सामना)  

८ सामन्यांत १६५.४० च्या सरासरीनं ८२७ धावा.

पृथ्वीनं उपांत्यापूर्व फेरीत सौराष्ट्र विरुद्धच्या नाबाद १८५ धावांच्या खेळीनं महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला, लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाही ही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ आणि विराट कोहलीनं २०१२मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या.

विजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही पृथ्वीच्या नावावर आहे. त्यानं या मोसमात पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद २२७ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर संजू सॅमसन २१२*, यशस्वी जैस्वाल २०३, कर्ण कौशल २०२, वेंकटेश अय्यर १९८, रविकुमार समर्थ १९२, अजिंक्य रहाणे १८७ आणि पृथ्वी शॉ १८५* असा क्रमांक येतो. 

टॅग्स :पृथ्वी शॉविजय हजारे करंडकमुंबईउत्तर प्रदेशमहेंद्रसिंग धोनीविराट कोहली