कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यात पाकिस्तान सुपर लीग ( Pakistan Super League ) स्थगित करावी लागली आणि आता लीगचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( Pakistan Cricket Board ) हे प्रयत्न अजूनही अधांतरी लटकले आहे. ५ जूनपासून PSLला अबुधाबी येथे सुरुवात होणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी PCBला UAE सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यासाठी PSLमध्ये सहभागी होणारे पाकिस्तानी खेळाडू, सपोर्ट स्टाफ व ब्रॉडकास्टींग सदस्य ये कराची व लाहोर येथील हॉटेलमध्ये एकत्र आले आहेत. सध्याच्या घडीतील जगातील टॉप सहा फलंदाज; जाणून घ्या प्रत्येकाचा न मोडला जाणारा रिकॉर्ड!
या आठवड्यात हे सर्व सदस्य अबुधाबीसाठी रवाना होणे अपेक्षित आहे. दरम्यान, खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि ब्रॉडकास्टींग सदस्य यांना हॉटेलमध्येच अडकून रहावे लागले आहे आणि आश्चर्यचकितपणे त्यांचे अबुधाबीला जाण्याच्या प्रवासाला ३६ तास उशीर होणार आहे. त्यामुळे PSLच्या वेळापत्रकाला कात्री लागण्याची शक्यता आहे. ESPNCricinfo नं दिलेल्या माहितीनुसार २३३ जणांचा हा ताफा यात PCB अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, ते हॉटेलमध्ये अडकले आहेत. आधीच्या प्लाननुसार ते २५ तारखेला अबुधाबीसाठी रवाना होणं अपेक्षित होतं. PSLचे उर्वरित २० सामने ५ ते २० जून या कालावधीत होणे अपेक्षित आहे. पण, ही स्पर्धा वेळेत सुरू होईल की नाही, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ कोणते? BCCIची कमाई जाणून उडेल झोप!
PCBनं लीगमधील फ्रँचायझी मालकांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे आणि लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. या लीगसाठी गरजेचे असलेल्या भारतीय प्रोडक्शन क्र्यूला अजूनही UAEत जाण्याची परवानगी मिळालेली नाही. PCB त्यावरही काम करत आहे. दरम्यान, PCB नं मागील आठवड्यात बदली खेळाडूंचा ड्राफ्ट जाहीर केला आणि फ्रँचायझीला अतिरिक्त खेळाडू निवडण्याची परवानगी दिली.
PSLला यशस्वी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) कंबर कसली आहे. त्यात खेळाडूंना गरमीपासून संरक्षण करण्यासाठी ते नारळ पाणी, बर्फाचे कॉलर व बनियान, आदी वस्तूंचा वापर करणार आहेत. तेथील गरमीमुळे खेळाडूंच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये, यासाठी PCB प्रयत्नशील असणार आहेत. पेशावर जाल्मीचे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद अक्रम यांनी सांगितले की,''जूनमध्ये स्पर्धा खेळवणे अवघड आहे, परंतु अशक्य नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. विशेष करून गोलंदाजांसाठी.'' IPL 2021 Remaining Matches : तारीख ठरवली पण, खेळायला खेळाडू कुठेत?; BCCIची डोकेदुखी वाढलीय!
त्यांनी सांगितले की,''शरिरातील तापमान कायम राखण्यासाठी आम्ही अधिकाधिक नारळ पाणी खेळाडूंना देणार आहोत. खेळाडूंना हायड्रेटेड ठेवणे आणि क्रँप पासून वाचवण्याची गरज आहे. अधिक सामने रात्री खेळवण्यात येणार असल्यानं आम्हाला हिट स्ट्रोकची भीती नाही. खेळाडूंसाठी गारेगार बनियानची सोय करण्याचा फ्रँचायझीचा प्रयत्न आहे. '' PSLचे सहा सामने दिवसा खेळवण्यात येणार आहेत. अशात खेळाडूंना गरमीचा त्रास होऊ शकतो.
Web Title: PSL 2021: 233 members stuck in Lahore and Karachi hotels, PCB still awaits landing permits from UAE government
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.