- सौरव गांगुली
निसर्गाने भारताला ईडनवर कसोटी विजयापासून वंचित ठेवले. पहिले तीन दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेले. पाचव्या व अखेरच्या दिवशी श्रीलंका संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. सामना अनिर्णीत संपला असला तरी रंगतदार झाला. विराटने योग्य वेळी डाव घोषित केला आणि वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत श्रीलंकेच्या फलंदाजांना घाम फोडला.
ईडनच्या क्युरेटर व ग्राऊंड््समनची प्रशंसा करावी लागेल. त्यांनी चांगली खेळपट्टी तयार केली. येथे पाच दिवस खेळ शक्य झाला. पाचव्या दिवशीही निर्णायक सत्रामध्येही वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. खेळपट्टीची माती व हिरवळ याच्या वेगळ्या प्रजातीमुळे लढत रंगतदार झाली. नाणेफेकीचा कौल मिळविण्यात यश आले असते तर पावसाच्या व्यत्ययानंतरही भारतीय संघाने पहिल्या लढतीत बाजी मारली असती. अशा स्थितीत यजमान संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली असती आणि पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली असती. भुवनेश्वरने गेल्या दोन सत्रांमध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये कमालीची सुधारणा केली आहे, हे विशेष.
त्याचप्रमाणे पुजारा व कोहली यांनी गोलंदाजांना अनुकूल स्थितीमध्ये चांगली फलंदाजी करण्याची प्रचिती दिली. तिसºया स्थानासाठी पुजारा सर्वोत्तम फलंदाज आहे, हे माझे सुरुवातीपासूनचे मत आहे. त्याच्यात प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण समर्थपणे सांभाळण्याचे कसब आहे. विराटबाबत काय सांगायचे, विपरीत स्थितीमध्ये त्याची कामगिरी अधिक बहरते. त्याची खेळी लाजबाब होती. त्यामुळे भारतीय संघाला विजयाची संधी निर्माण झाली. सात खेळाडू बाद होतील, असे श्रीलंका संघाला वाटले नसावे. श्रीलंकेवर वर्चस्व गाजवत मालिकेत मनोवैज्ञानिक लाभ घेण्याबाबत विचार करायला हवा.
माझ्या मते विराट प्रत्येक सत्रागणिक खेळाडू व कर्णधार म्हणून अधिक शानदार होत आहे. आणखी एक शतकी खेळी केल्यानंतर त्याने हा एक आकडा असल्याचे केलेले वक्तव्य योग्यच आहे. जर त्याचा फिटनेस व फॉर्म असाच राहिला तर त्याच्याकडून भविष्यात बरेच काही येणे शिल्लक आहे. आता नागपूर कसोटीची चर्चा करायला हवी. संघव्यवस्थापन संघाला सध्या सुरू असलेल्या मालिकेत ग्रीनटॉपवर खेळविण्यास इच्छुक आहे. त्यामुळे नागपूरमध्येही ईडनप्रमाणे हिरवळ असलेली खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. द. आफ्रिका दौºयापूर्वी हे चांगले पाऊल आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजीचे आक्रमण धारदार झाले आहे. या मालिकेत त्याची चाचणी घेण्याची ही चांगली संधी आहे. फिरकीपटूंनाही द. आफ्रिकेत ग्रीनटॉपवर गोलंदाजी करावी लागणार आहे. त्यासाठी सज्ज राहण्यासाठी त्यांच्याकडे ही चांगली संधी आहे. फलंदाजांना मायदेशातच द. आफ्रिकेतील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची संधी राहील. श्रीलंका संघापुढे आणखी आव्हाने येणार आहेत. ग्रीन टॉपवर त्यांना आक्रमणामध्ये भेदकता आणावी लागेल. त्याचसोबत ‘लकमल अँड कंपनी’ला आपली भूमिका योग्य प्रकारे निभावण्याची संधी प्रदान करण्यासाठी फलंदाजांना आपल्या उणिवा दूर कराव्या लागतील. (गेमप्लॅन)
Web Title: Pujara, Kohli's batting is incomparable
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.