नवी दिल्ली : शानदार फॉर्मात असलेला भारताचा आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध फिरोजशाह कोटला मैदानावर तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी २०१७ मध्ये सर्वाधिक धावा फटकाविणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला.‘वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेला माजी फलंदाज राहुल द्रविड याचा वारसदार म्हणून ओळखला जात असलेल्या चेतेश्वर पुजारा याने ७ धावा फटकाविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला पिछाडीवर सोडले. एल्गर यापूर्वी यंदा सर्वाधिक धावा फटकावणाºया फलंदाजांमध्ये आघाडीवर होता. एल्गर याने यंदा १०९७ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध ४९ धावांची खेळी केली. आता यंदाच्या वर्षी त्याच्या नावावर ११ कसोटी सामन्यात ६७.०५ च्या सरासरीने ११४० धावांची नोंद झाली आहे.यंदा एक हजार धावा फटकावणाºया चार फलंदाजांमध्ये पुजाराचा समावेश आहे. यंदा पुजारा व एल्गर यांच्या व्यतिरिक्त श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने व भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे.एल्गरकडे पुजाराचा विक्रम मोडण्याची संधी आहे. एल्गरला झिम्बाब्वेविरुद्ध २६ ते २९ डिसेंबर या कालावधीत खेळल्या जाणाºया कसोटी सामन्यात हा विक्रम मोडण्याची संधी मिळू शकते.भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने ६७ धावांची खेळी करताना कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा पल्ला गाठला. विशेष म्हणजे आपल्या वाढदिवशीच धवनने ही कामगिरी केली. त्याचप्रमाणे धवन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठ हजार धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरला. पुजाराची ही ११५ वी प्रथमश्रेणी लढत होती. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पुजाराचा धमाका, २०१७ मध्ये सर्वाधिक धावा फटकाविणारा फलंदाज ठरला
पुजाराचा धमाका, २०१७ मध्ये सर्वाधिक धावा फटकाविणारा फलंदाज ठरला
चेतेश्वर पुजाराने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध फिरोजशाह कोटला मैदानावर तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी २०१७ मध्ये सर्वाधिक धावा फटकाविणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 2:57 AM