नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ काही दिवसांतच भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक डि कॉककडे सोपवण्यात आले आहे. या संघातून मात्र फॅफ ड्यू प्लेसिसला वगळण्यात आले आहे. पण कसोटी संघाच्या कर्णधारपदी मात्र प्लेसिस कायम असेल.
दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेन्टी-२० संघात तीन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज एनरीच नोर्जे, फिरकीपटू ब्योर्न फोर्चुन आणि फलंदाज बावुमा यांना संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा ट्वेन्टी-२० संघ : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.