Quinton de Kock ला 'ती' चूक भोवणार; मुंबई इंडियन्स त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत #Black Live Matter मोहीमेसाठी गुडघ्यावर बसून समर्थन देण्यास नकार दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:09 PM2021-10-27T18:09:07+5:302021-10-27T18:09:23+5:30

whatsapp join usJoin us
Quinton de Kock's BLM Fallout: Mumbai Indians Likely to Release Him; BBL Franchise Interested-Report | Quinton de Kock ला 'ती' चूक भोवणार; मुंबई इंडियन्स त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार

Quinton de Kock ला 'ती' चूक भोवणार; मुंबई इंडियन्स त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत #Black Live Matter मोहीमेसाठी गुडघ्यावर बसून समर्थन देण्यास नकार दिला. क्विंटननं सामन्यापूर्वी त्याचा हा निर्णय कर्णधार टेम्बा बवुमा याला कळवला आणि त्या लढतीतून माघार घेतली. पण, त्याच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं ( CSA) संघ व्यवस्थापनाकडून अहवाल मागवला आहे. त्यात आता इंडियन प्रीमिअय लीगमधील मुंबई इंडियन्स संघानं ( Mumbai Indians) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल  लिलावात ते क्विंटनला रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.

दक्षिण  आफ्रिकेच्या यष्टिरक्षक-फलंदाजाला आयपीएलमधून 5 लाख अमेरिकन डॉलर कमाई होते. २०१९पासून तो मुंबई इंडियन्सचा सलामीवीर म्हणून खेळतोय.  क्विंटननं घेतलेल्या पवित्र्यामुळे त्याचा आफ्रिकेकडून अखेरचा सामना खेळून झालाय, असे अनेकांनी मत व्यक्त केले. असे असताना बिग बॅश लीगमधील फ्रँचायझी त्याला घेण्यासाठी उत्सुक असल्याचे वृत्त  The Daily Telegraph नं दिले आहे. क्विंटन डी कॉकनं यंदाच्या आयपीएलमध्ये ११ सामन्यांत २९७ धावा केल्या आहेत. 

वर्णद्वेषी विरोधी मोहीमेला Quinton De Kock चा विरोध
वेस्ट इंडिजच्या सामन्यापूर्वी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं ( CSA) सर्व खेळाडूंना एक मेल पाठवला आणि त्यात त्यांनी स्पष्ट सूचना केल्या की ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक लढतीपूर्वी खेळाडूंनी #BlackLiveMatter चळवळीला पाठींबा दर्शवताना गुडघ्यावर बसणे बंधनकारक आहे. याच मुद्यावर क्विंटननं विरोध दर्शवला आणि त्यानं खेळण्यास नकार दिला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) यानंही क्विंटनच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केलं. 

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं काय म्हटलं?
सोमवारी सायंकाळी CSA नं खेळाडूंना मेल पाठवला आणि त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यापूर्वी गुडघ्यावर बसून “taking the knee” वर्णद्वेषी विरोधी मोहीमेला पाठींबा देण्याचे आदेश दिले. टीम इंडियानंही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात BLM मोहीमेला पाठींबा देताना गुडघ्याव बसले होते.  या स्पर्धेत सहभागी झालेले बरेचसे संघ असे करत आहेत आणि म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही तसे आदेश देण्यात आले आहेत.  
 

Web Title: Quinton de Kock's BLM Fallout: Mumbai Indians Likely to Release Him; BBL Franchise Interested-Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.