दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतून टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या आर अश्विननं मालिका गाजवली. त्यानं तीन कसोटींत एकूण 15 विकेट्स घेतल्या. भारतानं ही मालिका 3-0 अशी सहज खिशात टाकली. कसोटी मालिका गाजवल्यानंतर अश्विन विजय हजारे चषक वन डे स्पर्धेत तामीळनाडू संघात सहभागी झाला. पण, तामीळनाडू संघाला जेतेपदानं हुलकावणी दिली. अंतिम सामन्यात कर्नाटकने त्यांच्यावर 60 (डकवर्थ लुईस नियम) धावांनी विजय मिळवला. पराभवाच्या दुःखात असलेल्या अश्विननं स्वतःला अडचणीत आणणारे कृत्य केले.
कर्नाटक संघाविरुद्धच्या या सामन्यात अश्विन फलंदाजीला तिसऱ्या क्रमांकावर आला, परंतु त्याला 8 धावा करता आल्या. फलंदाजीला आलेल्या अश्विननं बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट घातले. त्यामुळे नियमभंग झाला आणि त्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयनं खेळाडूंना विजय हजार चषक स्पर्धेपूर्वी नियमांची माहिती दिली होती आणि वर्षानुवर्षे हे नियम चालूच आहेत. टीम इंडियाकडून खेळतानाच खेळाडू बीसीसीआयचा लोगा वापरू शकतात, स्थानिक क्रिकेटमध्ये नाही.
बीसीसीआयकडून सांगण्यात आले की,''बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट स्थानिक क्रिकेटमध्ये वापरायचे असल्यास त्या लोगोवर टेप लावण्याचा नियम आहे. हा नियम खेळाडूंसह सामनाधिकाऱ्यांनाही आहे. पण, जर एखाद्यानं नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.''
कर्नाटकचा फलंदाज मयांक अग्रवालनेही बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट घातले होते, परंतु त्या लोगोवर टेप लावण्यात आली होती.
वाढदिवशीच भारतीय खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; असा पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाजविजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामना आज कर्नाटक आणि तामीळनाडू यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात कर्नाटकचा प्रभावी गोलंदाज अभिमन्यू मिथून यानं ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे आज त्याचा 30वा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी इतिहासात स्वतःचं नाव नोंदवून अभिमन्यूनं स्वतःला अनोखी भेट दिली. अभिमन्यूनं अंतिम सामन्यात हॅटट्रिक घेतली आणि त्यानं 34 धावांत 5 फलंदाज माघारी पाठवून तामीळनाडूचा डाव 252 धावांत गुंडाळला.
- - विजय हजारे चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज
- - लिस्ट A क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा कर्नाटकचा पहिला गोलंदाज
- - रणजी करंडक आणि विजय हजारे अशा दोन्ही स्पर्धांत हॅटट्रिक नावावर असलेला दुसरा ( मुरली कार्तिक) गोलंदाज
त्यानंतर लोकेश राहुल ( 52*) आणि मयांक अग्रवाल ( 69*) यांनी तुफान फटकेबाजी करून संघाला 23 षटकांत 1 बाद 146 धावांपर्यंत मजल मारून दिली. पावसाच्या व्यत्यामुळे सामना थांबवण्यात आला आणि VJD नियमानुसार कर्नाटक 60 धावांनी पुढे राहिला.