जयपूर - आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सुरू असलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचे आव्हान ठेवले आहे. दमदार सुरुवातीनंतर चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर मधली फळी कोलमडल्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचे राजस्थानचे स्वप्न भंगले. चेन्नईने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी राजस्थानला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र रहाणे (14) आणि जोस बटलर (23) धावा काढून बाद झाल्यानंतर राजस्थानच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीतील संजू सॅमसन (6), राहुल त्रिपाठी (10) आणि स्टीव्हन स्मिथ (15) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- राजस्थानची फलंदाजी अडखळली, चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान
राजस्थानची फलंदाजी अडखळली, चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान
आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सुरू असलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचे आव्हान ठेवले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 9:39 PM