रणजी करंडक फायनल : विदर्भाकडे निसटती आघाडी

सौराष्ट्रच्या तळाच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी धावा काढून यजमान गोलंदाजांच्या नाकीनऊ आणल्यानंतरही रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात तिस-या दिवशी मंगळवारी विदर्भाला पहिल्या डावात पाच धावांची आघाडी मिळविण्यात यश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:11 AM2019-02-06T05:11:41+5:302019-02-06T05:12:05+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy final: A little lead to Vidarbha | रणजी करंडक फायनल : विदर्भाकडे निसटती आघाडी

रणजी करंडक फायनल : विदर्भाकडे निसटती आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : सौराष्ट्रच्या तळाच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी धावा काढून यजमान गोलंदाजांच्या नाकीनऊ आणल्यानंतरही रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात तिस-या दिवशी मंगळवारी विदर्भाला पहिल्या डावात पाच धावांची आघाडी मिळविण्यात यश आले.

विदर्भाच्या पहिल्या डावातील ३१२ धावांचा पाठलाग करणाºया सौराष्टÑने कालच्या ५ बाद १५८ वरून पुढे खेळताना सर्वबाद ३०७ पर्यंत मजल गाठली. दुसºया डावात विदर्भाने कर्णधार फैज फझल (१०) आणि संजय रामास्वामी (१६) यांना गमविताच दिवसअखेर २ बाद ५५ धावा झाल्या. दोन्ही सलामीवीरांना फिरकीपटू धर्मेंद्रसिंग जडेजा याने बाद केले. खेळ थांबला त्यावेळी गणेश सतीश (२४) आणि अनुभवी वसीम जाफर (५) हे खेळपट्टीवर होते. विदर्भाची आघाडी ६० धावांची असून, आठ फलंदाज शिल्लक आहेत.

व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर सकाळच्या सत्रात सौराष्टÑची सुरुवात खराब झाली. स्नेल पटेलने ८७ वरून पुढे प्रारंभ केला आणि लवकरच शतक (१०२ धावा) साजरे केले. त्याला उमेश यादवने वसीम जाफरकडे झेल देण्यास बाध्य करताच पाहुण्यांची स्थिती ७ बाद १८४ अशी झाली. जडेजा (२३) आणि कमलेश मकवाना (२७) यांनी आठव्या गड्यासाठी ३८ धावांची भागीदारी करत २०० धावा फळ्यावर लावल्या. जडेजाला जाफरकडे झेल देण्यास भाग पाडून डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटे याने ही जोडी फोडली. अक्षय वखरे याने मकवानाला धक्का देत सौराष्टÑचा नववा गडी बाद केला. कर्णधार जयदेव उनाडकट (४६) आणि चेतन सकारिया (नाबाद २८) यांनी मात्र गोलंदाजांना घाम गाळायला लावून अखेरच्या गड्यासाठी तब्बल ६० धावांची भागीदारी केली, शिवाय संघाला ३०० पर्यंत पोहोचविले.या दोघांमुळे विदर्भाला केवळ पाच धावांची आघाडी घेता आली. वखरेने उनाडकटला बाद करत सौराष्टÑचा पहिला डाव संपविला.

विदर्भाचे दोन्ही सलामीवीर फैज अणि संजय हे सुरुवातीला चाचपडत राहिले. पहिल्या १० षटकांत दोघांना केवळ १० धावा काढता आल्या. उनाडकट आणि सकारिया यांचा मध्यमगती मारा खेळणे कठीण जात होते. उनाडकटने जडेजाच्या फिरकी माºयाचा उपयोग केला. त्याने ३६ धावा देत दोघांनाही बाद केले. चौथ्या दिवशी विदर्भ कुठंपर्यंत मजल गाठतो, यावर जेतेपदाचा निर्णय अवलंबून असणार आहे.

धावफलक

विदर्भ पहिला डाव : १२०.२ षटकांत सर्वबाद ३१२.

सौराष्ट्र पहिला डाव : हार्विक देसाई पायचित गो. सरवटे १०, स्नेल पटेल झे. वखरे गो. उमेश यादव १०२, विश्वराज जडेजा पायचित गो. सरवटे १८, चेतेश्वर पुजारा झे. जाफर गो. सरवटे ०१, अर्पित वसवदा झे. जाफर गो. वखरे १३, शेल्डल जॅक्सन झे. वाडकर गो. वखरे ०९, प्रेरक मांकड पायचित गो, सरवटे २१, कमलेश मकवाना झे. जाफर गो. वखरे २७, धर्मेंद्रसिंग जडेजा झे. जाफर गो. सरवटे २३, जयदेव उनाडकट झे. रामास्वामी गो. वखरे ४६, चेतन सकारिया नाबाद २८ अवांतर (९). एकूण ११७ षटकांत सर्व बाद ३०७. गोलंदाजी : रजनीश गुरबानी ८-३-१३-०, उमेश यादव २९-७-५९-१, आदित्य सरवटे ४०- १२-९८-५, अक्षय कर्णेवार २०-७-४८-०, अक्षय वखरे २०-१-८०-४.

विदर्भ दुसरा डाव : फैज फझल त्रि.गो. धर्मेंद्र जडेजा १०, संजय रामास्वामी यष्टिचित गो. जडेजा १६, गणेश सतीश खेळत आहे २४, वसीम जाफर खेळत आहे ५, अवांतर : ००, एकूण : ३१ षटकात २ बाद ५५ धावा. गोलंदाजी : जयदेव उनाडकट ८-३-७-०, चेतन सकारिया ४-२-२-०, कमलेश मकवाना ८-३-१०-०, धर्मेंद्र जडेजा ११-०-३६-२.

Web Title: Ranji Trophy final: A little lead to Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.