टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले. शास्त्रींना चौथ्या कसोटीदरम्यान कोरोना झाला होता. त्यानंतर शास्त्रींसह सपोर्ट स्टाफ सदस्यही विलगीकरणात गेले. पण, अजूनही ही तिघं इंग्लंडमध्येच अडकली आहेत. त्यांना अजून ‘fit to fly’ सर्टीफिकेट मिळालेलं नाही. ( Team India head coach Ravi Shastri, bowling coach Bharat Arun and fielding coach R Sridhar are yet to become eligible to fly from England)
बीसीसीआय नाराज, विराट कोहलीला देणार आणखी एक दणका; रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी सोपवणार
टीम इंडियाचे इतर सदस्य इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईत दाखल झाले आहेत, परंतु शास्त्री, अरूण व श्रीधर हे अजूनही इंग्लंडमध्येच आहेत. या सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेलला आहे आणि त्यांनी १० दिवसांचा विलगीकरण कालावधीही पूर्ण केला आहे. त्यांना यूएईसाठी विमानात बसण्यासाठी ''fit to fly'' टेस्ट द्यावी लागेल आणि त्यात पास झाल्यावरच त्यांना इंग्लंड सोडता येईल.
कठीण प्रसंग येताच विराट कोहली सोडून द्यायचा साथ; खेळाडूंचाही नव्हता त्याच्यावर विश्वास!
''रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर श्रीधऱ हे कोरोनातून सावरले आहेत आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. त्यांनी विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे. पण, नियमाचा भाग म्हणून त्यांना ३८ CT गुण मिळवावे लागतील आणि त्यानंतरच त्यांना fit to fly सर्टिफिकेट दिला जाईल. येत्या दोन दिवसांत ते लंडनहून विमानात बसतील अशी खात्री आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.