कराची : 'रावळपिंडी एक्सप्रेस' नाव ऐकले तर भल्या भल्या फलंदाजांना घाम फुटायचा. कारण पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर किती वेगाने चेंडू टाकेल आणि आपली भंबेरी उडवेल, असा विचार फलंदाज करायचे. शोएबने निवृत्ती घेतल्यावर बऱ्याच फलंदाजांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण आताच्या फलंदाजांसाठी एक बॅड न्यूज आहे. कारण शोएबने क्रिकेटमध्ये कमबॅक करायचे ठरवले आहे.
पाकिस्तान क्रिकेट लीगला १४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये शोएब पुनरागमन करणार आहे. याबाबतची माहिती शोएबने आपल्या ट्विटवर हँडलवरून दिली आहे. ट्विटरवर शोएबने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये आपण १४ फेब्रुवारीला क्रिकेटमध्ये कमबॅक करत असल्याचे म्हटले आहे. शोएबच्या या ट्विटवर वसिम अक्रम आणि शोएब मलिक या दोघांनी कमेंटही केली आहे.
अख्तरने दिले होते कोहलीला चॅलेंजकोहलीच्या या विक्रमी खेळीचे सर्व स्तरातून कौतुक झाले. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही कोहलीची भरभरून प्रशंसा केली. मात्र, त्याचवेळी रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएबने कोहलीला अतिविराट चॅलेंज दिले. त्याने ट्विटरवर एक पोस्ट टाकून कोहलीला 120 शतकांचा पल्ला पार करण्याचे आव्हान दिले. तो म्हणाला,'' गुवाहाटी, विशाखापट्टणम, पुणे. विराट कोहली हे अजब रसायन आहे. त्याने वन डेत सलग तीन शतक झळकावली. त्याचे खूप खूप अभिनंदन. तु असाच खेळत राहा. मी तुला 120 शतकांचे लक्ष्य देतो.''
शोएब स्वतःला 'क्रिकेटचा डॉन' म्हणाला, नेटकऱ्यांनी 'बाप' दाखवला!आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरची नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलीच धुलाई केलीय. अर्थात, त्याला कारणीभूत स्वतः शोएबच ठरला. त्यानं एका ट्विटमध्ये स्वतःला 'डॉन ऑफ क्रिकेट' म्हणवून घेतलं आणि मग नेटिझन्सनी त्याला धुतलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला हाणलेल्या षटकाराचे व्हिडीओ पोस्ट करून ट्विपल्सनी त्याला 'बाप' दाखवला.
आपल्या काही बाउन्सर आणि यॉर्कर चेंडूंनी फलंदाजांची कशी दाणादाण उडवली होती, याचे फोटो शोएब अख्तरने एका ट्विटमधून शेअर केले होते. या सगळ्यात कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, वगैरे भावनाही त्यानं व्यक्त केल्या होत्या. पण, त्याच्या ट्विटमधला 'डॉन ऑफ क्रिकेट' हा शब्द भारतीय क्रिकेटप्रेमींना खटकला.